Sharad Pawar Star Campaigner eSakal
लोकसभा २०२४

Lok Sabha Election : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; अमोल कोल्हे, जयंत पाटलांसह ४० दिग्गज नेत्यांचा समावेश

Star Campaigner : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचंही नाव आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Sharad Pawar Star Campaigner : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यासह देशात घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह ४० प्रचारकांच्या नावांचा यामध्ये समावेश आहे.

शरद पवार गटाकडून पाच उमेदवार जाहीर

शरद पवार गटाने लोकसभा निवडणुकांचे पाच उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये वर्ध्यातून अमर काळे, बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरुरमधून सुप्रिया सुळे, नगरमधून निलेश लंके, तसेच दिंडोरीमधून भास्करराव भगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर माढा आणि सातारा लोकसभेचे उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाहीत. या जागांचे उमेदवार लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

कोणत्या नावांचा समावेश?

राष्ट्रवादी शरद पवार गटानेही आपल्या ४० स्टार प्रचारकांनी यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या या पहिल्या यादीत अमोल कोल्हे, निलेश लंके, राजेश टोपे, एकनाथ खडसे, रोहिणी खडसे यांचा देखील समावेश आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे स्टार प्रचारक

याशिवाय, फौजिया खान, पी. सी. चाको, धीरज शर्मा, वंदना चव्हाण, धीरज शर्मा, सिराज मेहंदी, सोनिया दुहान, शब्बीर विद्रोही, यशवंत गोसावी, बाळासाहेब पाटील, पार्थ पोळके, ऍड. जयदेव गायकवाड, शशिकांत शिंदे, अशोक पवार, अरुण लाड, प्राजक्त तानपुरे, सुनील भुसार, नसीम सिद्दीकी, विकास लवंडे, रोहित पाटील, राजू आवळे, मेहबूब शेख, प्रकाश गजभिये, पंडित कांबळे, रवी वरपे, नरेंद्र वर्मा, राज राजापूरकर, संजय काळबांडे, जावेद हबीब, सक्षणा सलगर आणि पूजा मोरे यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: OUT or NOT OUT? जो रूटने अफलातून झेल, नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; राहुल द्रविडचा विक्रम मोडला, पण रंगलाय वाद

World Heritage status: अभिमानाची बाब! शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश

Shambhuraj Desai : संजय राऊतांच्या वक्तव्याची पर्यटनमंत्री शंभुराज देसाईंनी उडवली खिल्ली

खरीप हंगामात ८१,००० शेतकऱ्यांना ११४० कोटींचे पीककर्ज! ६३ हजार ८४९ शेतकऱ्यांच्या १०३० कोटी रुपयांच्या पीककर्जाचे बॅंकांनी केले नवे-जुने

Latest Marathi News Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT