new political party mard esakal
लोकसभा २०२४

Mard Party: आता 'मर्द' पक्ष आलाय...पुरुषांचा आवाज उठवणार, लखनऊच्या जागेसाठी उमेदवाराची घोषणा, जाहीरनामाही प्रसिद्ध

Mard Party: मर्द पक्षाचे संस्थापक म्हणाले, महिलांसाठी अनेक कायदे आणि हेल्पलाइन अस्तित्वात आहेत, परंतु पुरुषांसाठी असे काहीही नाही. हुंडाप्रथा, कौटुंबिक हिंसाचार, खोट्या केसेस अशा प्रकरणांमध्ये पुरुषांचे अनेकदा शोषण होते.

Sandip Kapde

Mard Party: महिलांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या अनेक संस्था आणि पक्षांबद्दल तुम्ही ऐकले असेल. सध्या सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचारामध्ये देखील महिलांना आश्वासन देताना राजकीय नेते दिसतात. पण आता एक असा पक्ष आला आहे जो पुरुषांसाठी काम करेल. हा पक्ष माझा हक्क राष्ट्रीय दल (MARD), म्हणजेच मर्द आहे.

हा पक्ष पुरूषांच्या प्रश्नांवर भर देणार, असे पक्ष संस्थापकांनी सांगितले आहे. हा पक्ष 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी करत आहे. खरे तर या पुरुष नेत्याची लखनऊमध्ये जोरदार चर्चा होत आहे. या पक्षाने आपला जाहीरनामाही जारी केला आहे.

हुंडा बंदी कायदा आणि कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायद्याशी संबंधित कायदेशीर अडचणी आलेल्या पुरुषांनी 2009 मध्ये मर्द पक्षाची स्थापन केली. त्यानंतर त्यांनी अनेक निवडणुका लढवल्या. परंतु सर्व निवडणुकांमध्ये त्यांचे डिपॉझीट जप्त झाले. त्यांना निवडणुकीत यश मिळाले नाही.

मर्द पक्ष 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी लखनऊ, गोरखपूर आणि रांची येथील उमेदवारांसह तयारी करत आहे. संस्थापक आणि पक्षाचे अध्यक्ष कपिल मोहन चौधरी स्वतः लखनऊमध्ये निवडणूक लढवणार आहेत. कपिल मोहन चौधरी स्वत: 1999 पासून घटस्फोट प्रकरणात अडकले आहेत. हे प्रकरण अजून निकाली लागले नाही.

घटस्फोट आणि चालू असलेल्या कायदेशीर लढाईतील वैयक्तिक अनुभवांमुळे मर्द पक्षाच्या निर्मितीला चालना मिळाल्याचे कपिल यांनी सांगितले. त्याने 2011 मध्ये पुनर्विवाह केला आणि राजकीय माध्यमांद्वारे पुरुषांच्या हक्कांचे समर्थन करणे सुरू ठेवले. 'मर्द को दर्द होता है' ही पक्षाची घोषणा आणि त्यांचा मूळ संदेश आहे.

मर्दच्या जाहीरनाम्यामध्ये 'पुरुष कल्याण मंत्रालय' आणि 'पुरुषांसाठी राष्ट्रीय आयोग' तसेच विद्यमान कायद्यांमधील पूर्वाग्रहांपासून पुरुषांचे संरक्षण करण्यासाठी 'पुरुष सुरक्षा विधेयक' सारख्या कायद्याचे प्रस्ताव समाविष्ट आहेत. इतर उपक्रमांमध्ये कौटुंबिक-संबंधित समस्यांसाठी 'मेन्स पॉवर लाइन' आणि 'फॅमिली वेल्फेअर कमिटी' स्थापन करणे समाविष्ट आहे जे घटस्फोटानंतर मुलांच्या ताबा यांसारख्या बाबींवर देखरेख करेल.

पक्षाचे संस्थापक कपिल चौधरी म्हणाले, महिलांसाठी अनेक कायदे आणि हेल्पलाइन अस्तित्वात आहेत. परंतु पुरुषांसाठी असे काहीही नाही. हुंडाप्रथा, कौटुंबिक हिंसाचार, खोट्या केसेस अशा प्रकरणांमध्ये पुरुषांचे अनेकदा शोषण होते. मर्दच्या जाहीरनाम्यात हा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.

पुरुषांच्या हक्कासाठी लढणाऱ्या या पक्षात महिलांना देखील स्थान असल्याचे कपील चौधरी यांनी सांगितले. महिलांच्या अधिकारांना कमी न करता पुरुषांच्या हक्कांचे रक्षण करणे हे त्यांचे ध्येय आहे. कपिल चौधरी मर्द पक्षाकडून लखनऊ लोकसभा मतदारसंघातून राजनाथ सिंह आणि रविदास मेहरोत्रा ​​यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Semi Final Scenario: पाकिस्तान 'उपकारा'वर जगणार, एका जागेसाठी तिघांमध्ये स्पर्धा रंगणार! जाणून घ्या मजेशीर समीकरण

Pune Metro : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो एप्रिलअखेर धावण्याची शक्यता, पण स्थानकांची कामे अपूर्णच

अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन, वडिलास भरावा लागेल १०,००० दंड! सोलापूर शहरात बेशिस्त वाहनचालकांवर ‘सिग्नल’च्या ठिकाणी पण कारवाई; १४ मार्चला लोकअदालत

President Droupadi Murmu Shegaon Visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शेगावात होणार आगमन; तीन हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात

PAK vs ENG, T20 WC: हॅरी ब्रूकचे विश्वविक्रमी शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत! पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? पाकड्यांची रडारड...

SCROLL FOR NEXT