Lok Sabha Election Result 2024 Sakal
लोकसभा २०२४

Lok Sabha Election Result 2024 : मविआ-महायुतीच्या मतांत किरकोळ फरक

मुंबईत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यासह मित्रपक्षाने लोकसभेच्या चार जागा जिंकल्या.

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News : महाराष्ट्रात भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही आणि अपेक्षेपेक्षा खूप कमी जागा मिळाल्याचे मान्य करत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मविआ’पेक्षा भाजपच्या नेतृत्वातील महायुतीला केवळ ०.३ टक्के कमी मते मिळाल्याची आकडेवारी सादर केली.

मुंबईत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यासह मित्रपक्षाने लोकसभेच्या चार जागा जिंकल्या. मात्र महायुतीला विजयी उमेदवारांपेक्षा तब्बल दोन लाख मते जास्त आहेत. ‘मविआ’ला राज्यात ४३.९ टक्के मते मिळाली तर महायुतीला ४३.६ टक्के. केवळ ०.३ टक्के कमी मतांमुळे जागात प्रचंड तफावत झाली.

‘मविआ’ला राज्यात २ कोटी ५० लाख तर महायुतीला २ कोटी ४८ लाख मते मिळाली. मुंबईत तर महायुतीने ‘मविआ’पेक्षा एकूण दोन लाखांहून अधिक मते घेत २६ लाख ६२ हजार मते मिळवली. गेल्या निवडणुकीत भाजपने २७.८४ टक्के मते घेत २३ जागा जिंकल्या.

या वेळी मते थोडीशी घसरून २६.१७ टक्के मते मिळाली, पण जिंकलेल्या जागांची संख्या मात्र घसरून ९ वर आली आहे.काँग्रेसने १६.४१ टक्क्यांवरुन १७ टक्क्यांवर पोचली पण जागा मात्र एकवरुन १३ जागांवर झेप घेतली आहे.

‘मराठी’ने ‘आघाडी’ला बळ

मुंबईत लोकसभा निवडणुकीत सर्वच मतदारसंघातील मराठी टक्का कमी अधिक प्रमाणात असून या निवडणुकीत मराठी भाषिकांनी महाविकास आघाडीला बळ दिल्याचे निकालावरून दिसून येते. मुंबईतील सहापैकी चार जागा आघाडीला मिळाल्या, या यशात मराठी मतदारांची भूमिका निर्णायक ठरली. मराठी टक्का अजूनही मुंबईत टिकून असल्याचे या निवडणुकीत दिसले.

तीन पक्ष एकत्र आल्यामुळे मतांची बेरीज झाली. निकालात बदल झाला. मतदानाचा तिकडचा आकडा वाढला पण तोही अल्पसा आहे.

- आशिष शेलार, भाजपचे नेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain: पुण्यात मुसळधार पावसाचा कहर; वाघोली-लोहगाव रस्ता बंद, खासगी कंपनीची बस अडकली, सकाळपासून घडलेल्या घटना!

Chhatrapati Sambhajinagar: मराठवाड्यात ऊन-सावलीच्या खेळात मध्येच कधीतरी रिमझिम, अलर्टमध्येही पावसाची पाठ; दीड ते तीन मिमी नोंद

Latest Marathi News Update: वंरध घाटात पुन्हा दरड कोसळली, ५ ते ७ गाड्या अडकल्या; रस्ता बंद

सेलिना जेटलीच्या पुनरागमनामागचं कारण काय? १५ वर्षांनी स्वीकारली कारकिर्दीतील 'सर्वात मोठी' भूमिका

Bhimashankar Update : भीमाशंकरला जाण्याचा बेत आखताय? मुसळधार पावसामुळे 'ही' प्रसिद्ध पर्यटनस्थळे पुढील आदेशापर्यंत बंद, कधी होणार पुन्हा खुली?

SCROLL FOR NEXT