Loksabha Election Voting sakal
लोकसभा २०२४

Loksabha Election Voting : आजींचा १०६व्या वर्षीही मतदानासाठी उत्साह

शिरूर विधानसभा मतदारसंघातील १०६ वर्षांच्या रखमाबाई शेळके आणि १०५ वर्षे वयाच्या अनुसया सोंडेकर यांनी टपाली मतदानाचा पर्याय न स्वीकारता पिंपळे जगताप केंद्रावर येऊन मतदान केले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शिरूर विधानसभा मतदारसंघातील १०६ वर्षांच्या रखमाबाई शेळके आणि १०५ वर्षे वयाच्या अनुसया सोंडेकर यांनी टपाली मतदानाचा पर्याय न स्वीकारता पिंपळे जगताप केंद्रावर येऊन मतदान केले. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात ९८ वर्षांच्या विमला शिंगणे, पिंपरी विधानसभा मतदारसंघातील ९८ वर्षांच्या लक्ष्मीबाई गराडे, ९० वर्षांच्या कलावती कांबळे यांनी केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.

जिल्ह्यातील पुणे, मावळ व शिरूर लोकसभा मतदारसंघात नवमतदारांसह ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला, गर्भवती महिला, तृतीयपंथींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ज्येष्ठ नागरिकांची मतदानाप्रती कमालीची जागरूकता दिसून आली. केंद्रावर ज्येष्ठांसाठी उपलब्ध सुविधांमुळे त्यांना मतदान करता आले.

जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे म्हणाले, ‘‘रखमाबाई शेळके, अनुसया सोंडेकर, शालू राठोड, दुर्धर आजाराने ग्रस्त आणि दिव्यांग मतदारांनी प्रत्यक्ष केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावला. हे आपले प्रेरणादूतच आहेत. अशा मतदारांकडून प्रेरणा घेऊन सर्व पात्र मतदारांनी प्रत्येक निवडणुकीत मतदान करायला हवे.

’’ उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे म्हणाल्या, ‘‘शालू राठोड यांनी प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी मतदान करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांची राष्ट्रीय कर्तव्याप्रती असणारी भावना इतरांनाही प्रेरक आहे. त्यांना प्रशासनाकडून सहकार्य करण्यात आले.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT