Loksabha Election Voting  sakal
लोकसभा २०२४

Loksabha Election Voting : मतदानासाठी उद्या कामगारांना पगारी सुट्टी

जिल्ह्यात बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी (ता. ७) मतदान होत आहे. त्यामुळे मतदारसंघातील सर्व आस्थापनांनी कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुट्टी द्यावी, असा आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : जिल्ह्यात बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी (ता. ७) मतदान होत आहे. त्यामुळे मतदारसंघातील सर्व आस्थापनांनी कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुट्टी द्यावी, असा आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिला आहे. तसेच नागरिकांनी मतदान केंद्राची माहिती घेऊन मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर आणि खडकवासला असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. भोर विधानसभा मतदारसंघात म्हाळुंगे, सूस, बावधन बुद्रूक, ताथवडे, हिंजवडी, पिरंगुट, माण, भुकूम, भूगाव, लवळे; तर खडकवासला विधानसभा मतदारसंघात कात्रज, धायरी, नऱ्हे, वडगाव बुद्रूक, वारजे, शिवणे खडकवासला, खेड शिवापूर, बिबवेवाडी (काही भाग) या शहरी भागाचा समावेश आहे. या भागातील मतदारांना मतदान करता यावे, यासाठी मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर केली आहे.

बारामती मतदारसंघातील ग्रामीण भागासह शहराशी संलग्न भागात उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाअंतर्गत सर्व आस्थापना, कारखाने, खासगी कंपन्या, दुकाने, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम, माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, खरेदी केंद्रे, मॉल, किरकोळ विक्रेते आदी ठिकाणी कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी देऊन मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन दिवसे यांनी केले आहे.

माहितीसाठी सहाय्यता कक्षाशी संपर्क साधा

मतदान केंद्राच्या माहितीसाठी मतदान केंद्र किंवा मतदान सहायता कक्षाशी संपर्क साधावा. निवडणूक आयोगाच्या https://electoralsearch.eci.gov.in/pollingstation या लिंकवर जाऊन आपल्या मतदान केंद्राविषयी माहिती घेता येईल. वोटर हेल्पलाइन ॲपवरही मतदान केंद्राची माहिती घेता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: 'माझेही नाव पुरस्कारांच्या यादीत टाका..!' पुण्यातील बेकायदा फ्लेक्स विरोधी मोहिमेवर CM फडणवीस खूश; नेत्यांना कानपिचक्या

Loni Kalbhor Police : तडीपारीचा आदेश धुडकावून थेऊरमध्ये प्रवेश; लोखंडी कोयता बाळगणाऱ्या तरुणाविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Loha News : विष्णुपुरी प्रकल्प लाभार्थी शेतकर्‍यांचे 29 नोव्हेंबरला काळेश्वर घाटावर प्रतीकात्मक जलसत्याग्रह

Latest Marathi News Live Update: किडनी रॅकेटमधील दिल्लीच्या डॉक्टरचा जामीन फेटाळला; चंद्रपूर सत्र न्यायालयाचा निर्णय

Delimitation Bill: दोन तृतीयांश बहुमताचा पेच! मोदी सरकारचा 'प्लॅन बी' तयार; मतदानावेळी नेमकं काय घडू शकतं?

SCROLL FOR NEXT