Raosaheb Danve  sakal
लोकसभा २०२४

Raosaheb Danve : पवार-ठाकरेंचा पाठिंबा लागणार नाही ;केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा पंढरपूरमध्ये दावा

लोकसभा निवडणुकीत भाजपला ४०० पेक्षा अधिक जागा मिळतील, यात कोणतीच शंका नाही. महाराष्ट्रात देखील महायुती ४५ पेक्षा जास्त जागा जिंकेल, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.

सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर : लोकसभा निवडणुकीत भाजपला ४०० पेक्षा अधिक जागा मिळतील, यात कोणतीच शंका नाही. महाराष्ट्रात देखील महायुती ४५ पेक्षा जास्त जागा जिंकेल, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. त्यामुळे निवडणूक निकालानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडे पाठिंबा मागण्याची वेळ आमच्यावर येणार नाही, असा दावा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज येथे केला.

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आज एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपुरात आले होते. दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी पुन्हा नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी आमदार समाधान आवताडे, माजी मंत्री सुभाष देशमुख, प्रणव परिचारक आदी उपस्थित होते. मंदिर समितीच्या वतीने मुख्याधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते मंत्री दानवे यांचा सत्कार केला.

राजकारणात काही होऊ शकते. इंडिया आघाडीला संख्याबळ मिळाले नाही तर पवार-ठाकरे काय करणार असा प्रश्न उपस्थित करत, त्यांच्याकडे पाठिंबा मागण्याची वेळ येणार नाही, असे श्री. दानवे यांनी स्पष्ट केले. देशातील हवा मोदींच्या बाजूने आहे.

त्यामुळे भाजप आणि मित्रपक्षाच्या ४०० हून अधिक जागा निवडून येतील, यात आमच्या मनात तिळमात्र शंका नाही. महाराष्ट्रात देखील महायुती भक्कम आहे. त्याचा फायदा निवडणुकीत झाला आहे. महायुतीचे किमान ४५ जागा निवडून येतील, असा आम्हाला विश्वास आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील, हे सांगण्यासाठी कोणा भविष्यकाराची गरज नाही. देशात लोकशाही जिवंत आहे. त्यामुळे मनोज जरांगे व त्यांच्या कार्यकर्त्यांना विधानसभेची निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. त्यांनी निवडणूक लढवावी, आम्ही त्यांचे स्वागत करू, असेही दानवे म्हणाले.

आरएसएस-भाजप वेगळे होऊ शकत नाहीत

आरएसएस आणि भाजप कधीच वेगळे होऊ शकत नाहीत. आरएसएस ही आमची मातृसंस्था आहे. विरोधक जे. पी. नड्डा यांच्या विधानाचा विपर्यास करून भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहे. पण संघात आणि भाजपमध्ये कधीही भांडण होणार नाही. राजकारणात आम्हाला ते सल्ला देतील किंवा हस्तक्षेप करतील, असे मुळीच नाही असेही दानवे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : अजित आगरकरची शेवटची मिटींग अन् रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला; नेमकं काय शिजतंय? उद्याचा दिवस महत्त्वाचा

Woman biker hit and run: महिला रायडरला धडक देणारा कारचालक नेमका कोण? राजस्थानमधून केली अटक, व्हिडीओ झाला होता व्हायरल

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

SCROLL FOR NEXT