Rahul Gandhi Sakal
लोकसभा २०२४

Rahul Gandhi : ‘जनतेला मोदी व शहा यांचा कारभार आवडत नसल्याचा कौल' - राहुल गांधी

लढाई केवळ भाजप या राजकीय पक्षाच्या विरोधात नव्हती, तर भाजपसोबत सीबीआय, ईडी, न्यायपालिका या संस्थांच्या रक्षणासाठी होती.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा कारभार आवडत नसल्याचा कौल जनतेने या निवडणुकीतून दिला आहे,’’ असे मत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज व्यक्त केले. निकालानंतर पत्रकार परिषद घेत त्यांनी काँग्रेस व इंडिया आघाडीला साथ दिल्याबद्दल जनता आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले.

राहुल गांधी म्हणाले, ‘‘ही लढाई केवळ भाजप या राजकीय पक्षाच्या विरोधात नव्हती, तर भाजपसोबत सीबीआय, ईडी, न्यायपालिका या संस्थांच्या रक्षणासाठी होती. मोदी व शहांनी या संस्थांवर कब्जा केला होता.

त्यांना धमकाविले व घाबरविले होते. ही लढाई राज्यघटना वाचविण्याची होता. अनेक मुख्यमंत्र्यांना बेकायदा तुरुंगात टाकले गेले. राज्यघटना वाचविण्यात देशातील सर्वांत गरीब, दलित, वंचित व आदिवासींनी जोरदार समर्थन देत त्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे.’’

घटक पक्षांशी चर्चा करणार

सरकार स्थापन करण्याच्या संदर्भात काँग्रेसने अद्याप कोणताही निर्णय घेतला नसून इंडिया आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करून यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.

राहुल गांधी वायनाड (केरळ) व रायबरेली (उत्तर प्रदेश) या दोन्ही मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. या दोन्हींपैकी कोणता लोकसभा मतदारसंघ कायम ठेवायचा, याबद्दल अद्यापही आपण निर्णय घेतलेला नाही. काही दिवसांनी या संदर्भात निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मोदी व अदानी संबंध

लोकसभेचा निकाल लागल्यानंतर अदानी समूहाच्या शेअर मोठ्या प्रमाणावर गडगडल्याच्या घटनेबाबत राहुल म्हणाले, ‘‘मोदी व अदानी यांच्यामध्ये संबंध आहे. निवडणुकीचे निकाल लागल्याबरोबर शेअर बाजारात उलथापालट झाली आहे. सर्वसामान्य लोकांनासुद्धा माहिती आहे की, मोदी व अदानीमध्ये व्यावसायिक संबंध आहेत.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satish Jarkiholi ED Raid : मंत्री सतीश जारकीहोळींसह कन्या खासदार प्रियांका जारकीहोळी यांच्या घरांवर ईडीची छापेमारी; १८ ठिकाणी धाड

प्रणालीचं नाव घेताच कल्ला, आपल्याला कुणीही विचारत नाही, भडकली जान्हवी किल्लेकर; व्हायरल व्हिडिओवर किरण माने म्हणाले-

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

Satara Crime: मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचा AI मॉर्फ केलेला फोटो पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा; तीन फेसबुक अकाउंटधारकांसह यूट्यूब चॅनेलवर कारवाई

iPhone 18 Pro: Apple चा 'Surprise and Shine' इव्हेंट आज! पहिला फोल्डेबल फोन येणार? जाणून घ्या कधी अन् कुठे पाहायचा LIVE

SCROLL FOR NEXT