लोकसभा २०२४

Modi Cut Outs Removed: शिवाजी पार्क परिसरातील मोदी-शहांचे कटआऊट्स हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई

आयोगाच्या कारवाईवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली असून त्यांनी याविरोधात गोंधळ घालण्याचाही प्रयत्न केला.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात लावलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांचे अनधिकृत कटआऊट्स हटवण्याची वेळ भाजपवर आली. हा प्रकार आचारसंहितेचं उल्लंघन असल्याचं सांगत निवडणूक आयोगानं हे आदेश दिले आहेत. आयोगाच्या आदेशानंतर हे कटआऊट्स हटवण्यात आले आहेत. उद्या शिवाजी पार्कवर महायुतीची सांगता सभा पार पडणार आहे. (PM Modi Amit Shah cutouts removed from Shivaji Park area Mumbai action by ECI)

निवडणूक आयोगानं आदेश दिल्यानंतर मोठ्या पोलीस बंदोबस्तात हे बॅनर हटवण्यात आले आहेत. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. भाजपच्या कार्यकर्त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. त्यामुळं त्यांनी इथं चांगलाच राडाही घातल्याचं वृत्त आहे.

शिवसेना भवन ते शिवाजी पार्क या मार्गावर इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे मोठे कटआऊट रस्त्यांच्या कडेला फुटपाथवर लावण्यात आले होते.

दरम्यान, उद्याच्या शिवाजी पार्कमधील महायुतीच्या सभेला तिन्ही पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. काल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रॅलीमध्ये अजित पवार उपस्थित नव्हते पण उद्या होणाऱ्या सभेला मात्र अजित पवार हजेरी लावणार असल्याचं कळतं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Sindoor : मंदिरात काढली 'ऑपरेशन सिंदूर' ची रांगोळी; आरएसएसच्या २७ स्वयंसेवकांवर गुन्हा दाखल

Pitru Paksha 2025: १०० वर्षांनी पुन्हा एकदा! पितृपक्षाचा दुर्लभ योग; जाणून घ्या काय आहे खास?

Ganpati Visarjan 2025 Live Updates : समुद्राला भरती आल्याने लालबागच्या राजाचं विसर्जन रखडलं

Latest Maharashtra News Live Updates: बीडच्या भरत खरसाडे यांच्या वडिलांना माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या फोन

Chandra Grahan 2025: आज होणारा वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण, जाणून घ्या सुतक वेळ अन् 12 राशींवर होणारा परिणाम

SCROLL FOR NEXT