Pitroda_Modi 
लोकसभा २०२४

PM Modi on Pitroda: सॅम पित्रोदांच्या 'वारसा संपत्ती'वरील विधानावर PM मोदींचं भाष्य; म्हणाले, "जिंदगी के साथ भी..."

अमेरिकेतील वारसा संपत्ती कराचा उल्लेख करताना असा कायदा भारतात गरजेचा असल्याचं विधान पित्रोदा यांनी केलं होतं.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष आणि काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी नुकतंच एक विधान केलं. अमेरिकेतील उदाहरण देताना त्यांनी भारतात 'वारसा संपत्ती कर' लावण्याची मागणी केली होती. त्यांच्या या विधानावरुन चांगलीच खळबळ माजली आहे. भाजपला काँग्रेसविरोधात हे आयतं कोलीत मिळाल्यानं त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील भाष्य केलं आहे. (PM Modi comment on Sam Pitroda statement on inheritance tax)

काय म्हणाले होते पित्रोदा?

पित्रोदा म्हणाले होते की, अमेरिकेत वारसा संपत्ती कर लावला जातो. म्हणजे जर कोणाजवळ १०० मिलियन डॉलरची संपत्ती असेल आणि जर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर ती व्यक्ती या संपत्तीपैकी केवळ ४५ टक्के संपत्तीच आपल्या वारसांना देऊ शकतो. यातील ५५ टक्के संपत्ती ही सरकार जमा होते. हा एक मजेशीर नियम आहे. हा नियम सांगतो की जर तुम्ही संपत्ती बनवली आणि जर तुमचा मृत्यू झाला. तर तुम्हाला तुमची संपत्ती ही जनतेसाठी सोडावी लागेल. पण संपूर्ण नव्हे तर अर्धीच. हा निष्पक्ष कायदा मला चांगला वाटतो. (Latest Marathi News)

पण भारतात असा कायदा नाही. भारतात जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या वारसांना त्याची संपूर्ण संपत्ती मिळते. यातून जनतेला काहीही मिळत नाही. त्यामुळं भारतात लोकांना या बाबींवर वाद-विवाद करायला हवा. मला माहिती नाही की शेवटी या चर्चेतून काय निष्पण्ण होईल. पण जेव्हा आपण संपत्तीच्या पुनर्वितरणावर बोलतो तेव्हा आपण नवी नीती आणि नव्या कार्यक्रमांबाबत बोलतो. ही चर्चा जनतेच्या हिताची चर्चा आहे केवळ अतिश्रीमंत किंवा श्रीमंतांच्या हिताची नाही. (Marathi Tajya Batmya)

पण काँग्रेस अशा प्रकारचं धोरण तयार करेल ज्यातून संपत्तीचं वाटप चांगल्या प्रकारे होऊ शकेल. आपल्याकडं किमान वेतन नाही. जर देशात किमान वेतन लागू झलं आणि असं सांगितलं गेलं की, गरिबांना इतका पैसा दिला गेला पाहिजे तर हे संपत्तीचं वाटप होईल. भारतात श्रीमंत लोक आपल्या नोकरांची पिळवणूक करतात त्यांना पुरेसं वेतन देत नाहीत. पण हेच पैसे ते दुबई आणि लंडनमध्ये जाऊन सुट्टी एन्जॉय करतात. आपल्याकडं अद्याप किमान वेतनाचा कोणताही कायदा नाही.

PM मोदींनी साधला निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी छत्तीसगडमधील सुरगुजा इथं एका सभेत बोलताना पित्रोदा यांच्या या विधानावरुन काँग्रेसला धारेवर धरलं. काँग्रेसच्या जाहीरनाम्यातही राहुल गांधींनी म्हटलं की जर काँग्रेस सत्तेत आली तर संपत्तीचं सर्वेक्षण करण्यात येईल. यावरही पंतप्रधानांनी भाष्य केलं. त्यांनी म्हटलं की, "राजकुमार आणि 'राजघराण्याचे' सल्लागार सॅम पित्रोदा यांनी काही काळापूर्वी म्हटलं होतं की, मध्यमवर्गावर अधिक कर लादले जावेत. त्यानुसार आता काँग्रेस 'वारसा कर' लावणार आहे. तुम्ही कष्टानं जमा केलेली संपत्ती तुमच्या मुलांना मिळणार नाही, उलट काँग्रेसचे पंजे ते हिसकावून घेतील"

पित्रोदा यांच्या वक्तव्यामुळं काँग्रेसचा धोकादायक हेतू उघड झाला आहे. एलआयसीच्या पूर्वीच्या घोषणेचा उल्लेख करताना मोदी म्हणाले, "काँग्रेसचा लोकांना लुटण्याचा एक मंत्र आहे. जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी". नाव न घेता मोदींनी गांधी कुटुंबावर निशाणा साधला, ते म्हणाले, "ज्यांनी संपूर्ण काँग्रेस पक्षाला आपली वडिलोपार्जित संपत्ती मानली आणि ती आपल्या मुलांना दिली. तेच आता भारतीयांची संपत्ती मात्र त्यांच्या मुलांना देऊ इच्छित नाहीत"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT