Narendra Modi sakal
लोकसभा २०२४

Narendra Modi : पवार, ठाकरे यांनी ‘एनडीए’त यावे ; नंदुरबारमधील सभेत पंतप्रधान मोदी यांची ऑफर

‘अस्तित्व टिकविण्यासाठी प्रादेशिक पक्षांना काँग्रेसमध्ये विलीन व्हावे लागेल, असे काही लोक म्हणत आहेत. त्याऐवजी, निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादीवाल्यांनी अजित पवार यांच्यासोबत यावे, त्यांची स्वप्ने पूर्ण होतील,’’

सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार : ‘‘अस्तित्व टिकविण्यासाठी प्रादेशिक पक्षांना काँग्रेसमध्ये विलीन व्हावे लागेल, असे काही लोक म्हणत आहेत. त्याऐवजी, निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादीवाल्यांनी अजित पवार यांच्यासोबत यावे, त्यांची स्वप्ने पूर्ण होतील,’’ अशी ‘ऑफर’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना त्यांचे नाव न घेता दिली.

देशातील एससी, एसटी आणि ओबीसी यांचे आरक्षण संपवण्यासाठी ‘इंडिया’ आघाडी महाभक्षणाचे अभियान चालवत आहे, परंतु मोदी जिवंत आहे तोपर्यंत हे घडू देणार नाही, असे आश्‍वासनही मोदींनी दिले.

नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार डॉ. हीना गावित यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत मोदी बोलत होते. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित आणि इतर नेते उपस्थित होते. ‘हा मोदी वंचितांच्या आरक्षणाच्या महारक्षणाचा महायज्ञ चालवत असून वंचितांच्या अधिकारांचा मोदी चौकीदार आहे,’ असे म्हणत मोदींनी काँग्रेसवर कठोर टीका केली. मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा ‘नकली शिवसेना’, तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा ‘शहजादा’ असा उल्लेख केला.

मोदी म्हणाले, ‘‘प्रभू श्रीरामांच्या मंदिरात जाणे काँग्रेसला तत्त्वाच्या आणि संकेतांच्या विरुद्ध वाटते. यावरून अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण करण्याची त्यांनी गाठलेली पातळी लक्षात येते. त्याचबरोबर हिंदू संस्कृतीचे हनन करण्याचे षड्‌यंत्रही लक्षात येते. भारतातले काळे लोक कृष्णाच्या रंगाचे आहेत. शहजाद्याच्या गुरूला द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतिपदावर बसविल्याचेही मान्य नव्हते. यावरून काँग्रेसी लोकांची आदिवासी विरोधी मानसिकता लक्षात घ्यावी.

आदिवासी, दलित आणि वंचितांची सेवा करणे मी परिवाराची सेवा मानतो, कारण काँग्रेसवाल्यांप्रमाणे मी कुठल्या मोठ्या घराण्यात जन्मलो नाही. केवळ निवडणूक म्हणून नव्हे; तर आदिवासींच्या भावी पिढीच्या रक्षणासाठी प्रयत्न आम्ही सुरू केले. एकीकडे आमचा हा विकास करण्याचा प्रयत्न आहे, तर दुसरीकडे काँग्रेस आणि महाआघाडी यांच्याकडे विकास हा साधा शब्दसुद्धा नाही.

विकासकार्याच्या स्पर्धेत राहणे दूरच, याउलट ते खोटे बोलण्याची फॅक्टरी उघडून बसलेत.’’

शरद पवार यांचे नाव न घेता मोदी म्हणाले, ‘‘ते इतके हताश झाले आहेत की या निवडणुका संपल्यावर राजकीय जीवनात अस्तित्व टिकवण्यासाठी प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीनीकरण करूया, असे त्यांनी जाहीर केले आहे. चार जूनला निकाल जाहीर झाल्यानंतर नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादीवाल्यांनी अजित पवारांच्यासोबत यावे, छाती काढून उभे राहावे; नक्कीच त्यांचे स्वप्न पूर्ण होतील.’’

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जे मंजूर नव्हते, ते धर्मावर आधारित आरक्षण देण्याचे षड्‌यंत्र काँग्रेसने हाती घेतले आहे. एससी, एसटी आणि ओबीसी लोकांचे आरक्षण मुस्लिम अल्पसंख्याकांना देण्याचा कर्नाटकमधील फॉर्म्युला काँग्रेस आघाडी देशभर राबवू इच्छिते.

- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: विखे पाटील मनोज जरांगेंच्या भेटीला; भुजबळांना म्हणाले, चर्चेत का सहभागी झाला नाहीत?

PM Modi Reaction on GST Reform : ‘’मी लाल किल्ल्यावरून म्हणालो होतो, की..’’ ; GST 'रिफॉर्म'वर मोदींची पहिली प्रतिक्रिया!

Asia Cup 2025 साठी कर्णधार सूर्यकुमारसह हार्दिक पांड्या दुबईला रवाना; कुठे करणार सराव, काय आहे वेळापत्रक; घ्या जाणून

Latest Marathi News Updates: अंबादास दानवे, संजय शिरसाट यांनी घेतली जरांगेंची भेट

Mumbai Local: मुंबई लोकलच्या 'या' मार्गावर काही लोकल रद्द, का आणि कधी? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT