Prajwal Revanna_Rahul Gandhi 
लोकसभा २०२४

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

अनेक महिलांचं शोषण केल्यानं आणि याचे हजारो व्हिडिओ लीक झाल्यानं प्रज्वल रेवन्ना हे नाव सध्या देशभरात चर्चेत आलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

शिवमोग्गा : अनेक महिलांचं शोषण केल्यानं आणि याचे हजारो व्हिडिओ लीक झाल्यानं प्रज्वल रेवन्ना हे नाव सध्या देशभरात चर्चेत आलं आहे. प्रज्वल रेवन्ना हे माजी पंतप्रधान एचडी देवैगौडा यांचे नातू असून सध्या जेडीएसचे खासदार आहेत.

पण यंदा रेवन्ना पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणात असून प्रधानमंत्री मोदींनी स्वतः यांचा प्रचार केला होता. त्यामुळं आता भाजप आणि मोदी देखील अडचणीत आले आहेत. यापार्श्वभूमीवर राहुल गांधींनी मोदींना टार्गेट केलं आहे. (Prajwal Revanna case PM Modi should apologize to victims women demanded Rahul Gandhi at Shivmogga)

राहुल गांधी प्रचारानिमित्त सध्या कर्नाटकातील शिवमोग्गा इथं आले होते. यावेळी त्यांना प्रज्वल रेवन्नााबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, या ठिकाणी सर्वात मोठा इश्यू हा आहे की इथं जी रेवन्ना केस आहे. या रेवन्नानं मोठ्या प्रमाणावर महिलांवर अत्याचार केले आहेत, ४०० महिलांवर त्यानं अत्याचार केले आहेत. या व्यक्तीचा प्रधानमंत्र्यांनी प्रचार केला आहे. याचं उत्तर आणि त्या पीडित महिलांची माफी प्रधानमंत्र्यांनी मागितली पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रस्त्याच्या दर्जावरून लोकांनी प्रश्न विचारले, व्हिडीओ शूट करणाऱ्या तरुणाला मंत्र्यांने कानशिलात लगावली; VIDEO VIRAL

Ahilyanagar District Bank : अहिल्यानगर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गुप्त बैठक; सुजय विखेंचा थोरातांना वाकून नमस्कार चर्चेत

रिपोर्टवर ‘नॉर्मल’ लिहिलंय म्हणून खुश होऊ नका! हृदयाच्या आरोग्यासाठी कोलेस्ट्रॉलची आकडेवारी समजून घ्या!

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत वाघाचे अवयव आणि २ खवले मांजर जप्त

Asian Games 2026 : नाशिकच्या सर्वेश कुशारेनं जिंकलं ऐतिहासिक पदक! भारताच्या खात्यात १५ मिनिटांच्या अंतरानं ४ मेडल्स

SCROLL FOR NEXT