PM Modi  sakal
लोकसभा २०२४

PM Modi : ‘इंडिया’आघाडीचे नेते भेकड ; पंतप्रधान मोदींची टीका,पाकला बांगड्याही पुरवू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधताना त्यांना ‘भेकड’ असे म्हटले आहे. विरोधक हे पाकिस्तानच्या अण्वस्त्रांना घाबरतात, असा टोलाही त्यांनी या वेळी लगावला.

सकाळ वृत्तसेवा

मुझफ्फरपूर/हाजीपूर/सारण (बिहार) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधताना त्यांना ‘भेकड’ असे म्हटले आहे. विरोधक हे पाकिस्तानच्या अण्वस्त्रांना घाबरतात, असा टोलाही त्यांनी या वेळी लगावला.

पंतप्रधानांनी हाजीपूर, मुझफ्फरपूर आणि सारण या लोकसभा मतदारसंघांमध्ये एकापाठोपाठ एक सभा घेतल्या. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांच्या ताज्या वक्तव्याचा दाखला देत मोदींनी विरोधकांना धारेवर धरले.

पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘‘पाकिस्तानने जर त्यांच्या हातात बांगड्या घातल्या नसतील तर आम्ही त्यांना त्या घालायला भाग पाडू. मला माहिती आहे की त्यांच्याकडे खायला अन्नधान्य देखील नाही. आता तर असेही माझ्या कानावर पडले आहे की त्यांना बांगड्यांचा देखील पुरेसा पुरवठा होताना दिसत नाही. आमच्या विरोधकांमध्ये अत्यंत घाबरट आणि भित्र्या लोकांचा समावेश आहे. ही मंडळी आमच्या सर्जिकल स्ट्राईकवर संशय घेतात तसेच त्यांचे मित्र पक्ष असलेल्या डाव्यांना या देशाची अण्वस्त्रे नष्ट करायची आहेत. केंद्रामध्ये इंडिया आघाडीचे सरकार सत्तेमध्ये आले तर त्यातील प्रत्येक जण विशिष्ट काळासाठी आपआपसांत पंतप्रधानपद वाटून घेईल.’’

‘ईडी जोशात’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कारवायांचा उल्लेख करताना तपास संस्थेने जप्त केलेला पैसा हा गरिबांच्या मालकीचा असल्याचा दावा केला. ‘‘ काँग्रेसच्या काळामध्ये ‘ईडी’ने फक्त ३५ लाख रुपयांची रोकड जप्त केली होती. आमची सत्ता येताच ‘ईडी’ ने २ हजार २०० कोटी रुपये जप्त केले, ’’ असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: भाजप आमदाराने रिक्षाचालकाच्या कानशिलात लगावली; मुंबईतील धक्कादायक घटना, कारण काय?

Sonia Gandhi on VB-G-RAM-G: ''सरकारने ‘मनरेगा’वर बुलडोझर फिरवला'' ; नाव बदलावरून सोनिया गांधींची जोरादार टीका!

BMC Election: महापालिका निवडणुकीसाठी पोलीस सज्ज! मनाई आदेशांसह विशेष पथके तैनात; गुन्ह्यांवरही कडक नजर

Malaika Arora Fitness: 52 व्या वर्षीही मलायका अरोरा इतकी फिट कशी? हे आहे सिक्रेट; जेवणात भात...सकाळी तूप

Latest Marathi News Live Update : मालेगावमध्ये भीषण अपघात, वाहनाने दिली विद्यार्थिनीला धडक

SCROLL FOR NEXT