Loksabha Election 2024 sakal
लोकसभा २०२४

Loksabha Election 2024 : आश्‍वासनपूर्तीसाठी ताकद हवी , मोदी ; पंतप्रधानांचा विरोधकांना टोला

‘‘भाजपच्या नेतृत्वातील महायुती विकासाच्या मुद्द्यांवर भर देत आहे. याउलट विरोधकांची आघाडी मला हरविण्यासाठी आणि सत्ता मिळविण्यासाठी लढत आहे. इंडिया आघाडीकडे मुद्द्यांचा दुष्काळ असल्यानेच निव्वळ शिवीगाळ करून अपमान करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे,

सकाळ वृत्तसेवा

तळेगाव (जि. वर्धा) : ‘‘भाजपच्या नेतृत्वातील महायुती विकासाच्या मुद्द्यांवर भर देत आहे. याउलट विरोधकांची आघाडी मला हरविण्यासाठी आणि सत्ता मिळविण्यासाठी लढत आहे. इंडिया आघाडीकडे मुद्द्यांचा दुष्काळ असल्यानेच निव्वळ शिवीगाळ करून अपमान करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे,’’ असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील सभेत केला. आश्‍वासने पूर्ण करण्यासाठी अडचणींवर मात करण्याची ताकद हवी, असे मोदी या वेळी म्हणाले.

निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मतदान होत असलेल्या वर्धा व अमरावतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींची सभा झाली. देशाच्या विकासासाठी मोदींची गॅरंटी आहे. ही गॅरंटी निव्वळ बोलण्यातून येत नाही तर त्यासाठी कटिबद्धता पाहिजे, असे सांगून पंतप्रधानांनी आश्वासनांच्या पूर्ततेसाठी चोवीस तास काम करण्याची ग्वाही दिली. त्यांनी ‘२४ बाय ७ फॉर २०४७’ असा नाराही दिला. मोदी म्हणाले,

‘‘आश्वासने पूर्ण करण्यासाठी अडचणींवर मात करून काम करण्याची ताकद हवी. देशात काँग्रेसने आजवर केलेली पापे धुण्याचे काम या सरकारला करावे लागले. आता देशातील प्रत्येक मागास घटकाच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करण्याची वेळ आली आहे. देश विकासाच्या दिशेने पाऊल टाकत असताना कामे करणाऱ्याच्या पाठीशी उभे राहून आशीर्वाद देण्याची गरज आहे.’’ सभेसाठी संध्याकाळी पाचच्या सुमारास पंतप्रधानांचे मंचावर आगमन झाले. पाच वाजून ६ मिनिटांनी सुरू झालेले त्यांचे भाषण ३७ मिनिटे चालले.

‘प्रकल्पांकडे लक्ष’

येत्या काळात तीन कोटी महिलांना लखपती बनविण्याचा आणि घराघरांत पाइपने गॅस पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त करून मोदी म्हणाले, ‘‘सिंचनाची अवस्था बिकट आहे. काँग्रेसच्या काळात सिंचनप्रकल्प कधीच पूर्णत्वास गेले नाहीत. देशातील अशा एकूण ९९ प्रकल्पांपैकी बहुतांश प्रकल्प विदर्भातील होते.

या प्रकल्पांचे काम पूर्ण करण्याकडे केंद्र सरकारसह शिंदे आणि फडणवीस यांच्या सरकारचे लक्ष आहे. या भागाच्या विकासासाठी नागपूर-गोवा ग्रीन हायवेसाठी एक हजार कोटी रुपये खर्च करण्यासोबतच रेल्वे मार्ग सक्षम करण्याचे लक्ष्य आहे. तसेच अमरावती येथील टेक्स्टाईल पार्क आणि वर्धा येथील ‘ड्राय पोर्ट’चे कामही याचाच एक भाग आहे.’’

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणा, वर्ध्याचे उमेदवार रामदास तडस, मंत्री अतुल सावे, आमदार समीर कुणावर आणि इतर स्थानिक नेते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

AI Dictionary : एआयची 'ही' डिक्शनरी तुम्हाला बनवून टाकेल टेक-गुरु, जगभर का आहे ट्रेंडिंग? पाहा एका क्लिकवर

Avi Prasad IAS : चर्चित आयएएस अधिकाऱ्याने केले तिसरे लग्न, आधीच्या दोन्ही पत्नी आहेत जिल्हाधिकारी, तिसरी मंत्रालयात उपसचिव

'ती व्यक्ती आपल्यासोबत असली की...' जुई गडकरीच्या लाईफ पार्टनरबद्दल काय अपेक्षा? म्हणाली...'माझ्यासाठी खरं प्रेम हे...'

Success Story: शेतीसंघर्षातून उभी राहिली अधिकारीपदाची स्वप्ने; चिंचमंडळच्या शेतकरी पुत्राची तालुका कृषी अधिकारी पदाला गवसणी

SCROLL FOR NEXT