Priyanka Gandhi slams BJP 5 kg ration policy says you will not become Aatmanirbhar by this  Sakal
लोकसभा २०२४

Priyanka Gandhi: ...तरच भारत खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर होईल; प्रियांका गांधींची पंतप्रधान मोदींवर सडकून टीका

PM Modi vs Priyanka Gandhi: सध्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. त्यातच काँग्रेस पक्षाच्या स्टार प्रचारक प्रियांका गांधींनी आपल्या भावासाठी कंबर कसली आहे. उत्तर प्रदेशमधील राहुल गांधीच्या प्रचार सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेवर जोरदार टीका केली.

सकाळ वृत्तसेवा

PM Modi vs Priyanka Gandhi: सध्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. त्यातच काँग्रेस पक्षाच्या स्टार प्रचारक प्रियांका गांधींनी आपल्या भावासाठी कंबर कसली आहे. उत्तर प्रदेशमधील राहुल गांधीच्या प्रचार सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेवर जोरदार टीका केली.

प्रियांका गांधी म्हणाल्या की, ‘'देश ५ किलो रेशन देऊन आत्मनिर्भर होणार नाही तर रोजगार मिळाल्यानेच आत्मनिर्भर होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नरेंद्र मोदी आत्मनिर्भर भारताचे स्वप्न नागरिकांना दाखवत आहे. पण सध्याचा सत्ताधारी पक्ष ‘आत्मनिर्भर’ नव्हे तर परावलंबी धोरणे आखत आहे. अशा पक्षाची भूमिका आपल्या सर्वांना समजायला हवी.

सरकारने बेरोजगारी कमी करण्यासाठी काय पाऊले उचलली पाहिजेत तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोललं पाहिजे. सामान्य नागरिक आता मोदी सरकारला वैतागला आहे. तसेच सरकारने राजकारणावर चर्चा न करता नागरिकांच्या समस्या काय आहेत यावर चर्चा केली पाहिजे’'.

राहुल गांधीनी रायबरेली मतदारसंघातून आपल्या खासदारकीचा अर्ज भरल्यानंतर राहुल गांधींच्या ‘डरो मत’ घोषणेच्या भूमिकेवर भाजपातील नेत्यांनी जोरदार टीका केली होती. राहुल गांधी स्वत: घाबरत असल्यानेच रायबरेलीतून अर्ज दाखल केला आहे. अस त्यांच म्हणण होत. त्यानंतर आता या टीकेला प्रियांका गांधीनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

रायबरेली मतदारसंघातून काँग्रेस नेते राहुल गांधीच्या विरोधात भाजपचे उमेदवार दिनेश प्रताप सिंह आहेत. त्यामुळे आता रायबरेली मतदरासंघात कोण बाजी मारणार याची उत्सुकता दोन्ही पक्षांना लागली आहे. ती आता येत्या ४ जूनला निकालानंतर संपेल. येत्या २० मे ला रायबरेली मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

(स्टोरीः मनोज साळवे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : "नाशिकला संधी दिली आता मुंबईत संधी द्या" - अमित ठाकरे

Education Department : शिक्षक पुरस्काराबाबत उदासीनता; १० तालुक्यांतून केवळ दोन-दोनच प्रस्ताव

Crime News : ‘मुलबाळ होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; धारदार हत्याराने वार करून जीवे ठार मारल्याचा आरोप

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’च्या शूटिंगला सुरुवात ! आदिती तटकरे यांच्या हस्ते मुहूर्त सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT