Ravindra Dhangekar sakal
लोकसभा २०२४

Ravindra Dhangekar : काँग्रेसचे ‘एक नोट-एक व्होट’ ; रवींद्र धंगेकर यांच्‍यासाठी ४२,७०० रुपये लोकवर्गणी जमा

‘महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर सर्वसामान्य कुटुंबातून आले आहेत. त्यामुळे ‘एक नोट-एक व्होट’ देत नागरिकांनी ही निवडणूक आपल्या हाती घ्यावी,’ असे आवाहन केले जातात.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर सर्वसामान्य कुटुंबातून आले आहेत. त्यामुळे ‘एक नोट-एक व्होट’ देत नागरिकांनी ही निवडणूक आपल्या हाती घ्यावी,’ असे आवाहन केले जातात. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील मेळाव्यात ४२,७०० रुपये लोकवर्गणी जमा झाली.

धंगेकर यांच्या प्रचारासाठी या मतदारसंघात ॲड. चंदू कदम यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. त्यांनी हे आवाहन केल्यानंतर प्रतिसाद मिळाला. या वेळी धंगेकर यांच्यासह काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, रमेश बागवे, मोहन जोशी, चंद्रकांत मोकाटे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे शहराध्यक्ष संजय मोरे, गजानन थरकुडे, आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे व धनंजय बेनकर, पृथ्वीराज सुतार, योगेश मोकाटे, लक्ष्मी दुधाणे यांच्यासह इतर नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘स्मार्ट पुण्याचे स्वप्न दाखवत भाजपने संपूर्ण पुणे शहराची वाट लावली,’ असा आरोप धंगेकर यांनी केला. पुणेकरांना आता बदल हवा आहे. सर्वसामान्य पुणेकरांच्या नागरी व सामाजिक समस्या सोडविण्यासाठी जनतेत मिसळणारा उमेदवार म्हणून पुणेकर मला नक्कीच निवडून देतील, असा विश्‍वासही धंगेकर यांनी व्‍यक्‍त केला.

जगताप म्हणाले, ‘‘सामान्य जनतेसाठी धावून जाणारा माणूस म्हणून धंगेकर यांना पुणेकर नक्कीच भरभरून मतदान करतील.’’ या वेळी इतर वक्त्यांची भाषणे झाली. कोथरूड ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रवींद्र माझिरे यांनी प्रास्ताविक केले. यशराज पारखी यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द