Pune Loksabha sakal
लोकसभा २०२४

Pune Loksabha : निवडणूक खर्चाच्या नोंदी काटेकोर ठेवा ; जिल्हाधिकाऱ्यांचा खर्च निरीक्षकांना आदेश

जिल्ह्यातील चारही लोकसभा निवडणुकांसाठी विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून निवडणूक प्रचारासाठी केल्या जाणाऱ्या खर्चाच्या नोंदी कक्ष अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काटेकोरपणे अद्ययावत ठेवाव्यात, असा आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : जिल्ह्यातील चारही लोकसभा निवडणुकांसाठी विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून निवडणूक प्रचारासाठी केल्या जाणाऱ्या खर्चाच्या नोंदी कक्ष अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काटेकोरपणे अद्ययावत ठेवाव्यात, असा आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिला आहे.

लोकसभा निवडणूक खर्चाबाबतच्या विहित नमुन्यातील नोंदी व उमेदवारांनी दिलेल्या खर्चाच्या माहितीच्या नोंदींची पडताळणी करावी. या खर्चाच्या नोंदवह्या अद्ययावत ठेवाव्यात, अशी सूचना विविध लोकसभा मतदारसंघासाठी नियुक्त करण्यात आलेल्या निवडणूक खर्च निरीक्षकांना दिल्या आहेत.

दरम्यान, केंद्रीय लोकसेवा आयोगाने मावळ लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून सुंधाशू राय यांची नियुक्ती केली आहे. राय यांनी ‘पीएमआरडीए’ प्रशासकीय भवनातील मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास भेट दिली आणि तेथील कामकाजाची माहिती घेतली.

या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये स्थापित केलेल्या विविध कक्षांची माहिती दिली. या वेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले, समन्वय अधिकारी प्रवीण ठाकरे, हिम्मत खराडे आदी उपस्थित होते.

निवडणूक आयोगाकडून खर्च संनियत्रणावरील लेख्यांची तपासणी केली जाते. यात प्रत्येक उमेदवाराने निवडणूक प्रचारासाठी केलेल्या दैनंदिन खर्चविषयक लेख्यांची तपासणी करण्यात येते. या अनुषंगाने राय यांनी निवडणूक खर्च व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. निवडणूक खर्चाची नोंद योग्य पद्धतीने घ्यावी, अशा सूचना निरीक्षकांना केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Maharashtra SSC Exam 2027 : दहावीच्या विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा! बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

IND vs AFG 3rd T20I: इथे-तिथे-सगळीकडे राशिद खान... भन्नाट रन आऊट अन् दोन अविश्वसनीय झेलने फिरवली मॅच; Video Viral

US OPT Fee : अमेरिकेत शिक्षणानंतर नोकरी करण्याचा मार्ग महागणार? द्यावे लागणार एक कोटींचे OPT शुल्क, भारतीय विद्यार्थ्यांवर मोठा परिणाम

Eknath Shinde Dare Village : शिवसेना पक्ष-धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट दरे गावात दाखल

SCROLL FOR NEXT