Pune Loksabha sakal
लोकसभा २०२४

Pune Loksabha : कसबा, कोथरूड रंगले विजयाच्या गुलालात

सकाळी निकालाचा कल पाहत घरी बसलेल्या कार्यकर्त्यांनी दुपारच्या सुमारास बाहेरची वाट धरली. कोणी गल्लीत तर कोणी चौकात विजयाचे गणित मांडले.

सकाळ वृत्तसेवा

सकाळी निकालाचा कल पाहत घरी बसलेल्या कार्यकर्त्यांनी दुपारच्या सुमारास बाहेरची वाट धरली. कोणी गल्लीत तर कोणी चौकात विजयाचे गणित मांडले. वेळ सरत चालली, मतमोजणीच्या फेऱ्या वाढत गेल्या, तसे कार्यकर्त्यांचे ‘मोहोळ’ घोंघावू लागले. कसबा, कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या अभिनंदनाचे बॅनर झळकू लागले. विजयाच्या गुलालात केवळ कार्यकर्तेच नव्हे तर रस्ते देखील रंगले. सायंकाळी उत्साहाला उधाण आले, अन पावसात जल्लोषाची ‘बरसात’ झाली.

मोहोळ यांच्या विजयाचे ‘सेलिब्रेशन’ कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने केले. कसबा आणि कोथरूड मतदारसंघात मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा केला. काँग्रेसचे पराभूत उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा गड मानल्या जाणाऱ्या कसब्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी दुपारपासूनच जल्लोष सुरू केला होता.

माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या प्रभाग क्र. १६ येथील कार्यालयाजवळही कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. एकमेकांना पेढे भरवीत गुलालाची मुक्त उधळण केली. ध्वनिवर्धक लावून कार्यकर्ते बेभान होऊन नाचू लागले. पावसाच्या हजेरीने उत्साहाला उधाण आले होते. सायंकाळनंतर कसब्यातील विविध भागांतून मिरवणूक निघाली. सोमवार पेठ, १५ ऑगस्ट चौक, दारूवाला चौक आदी भागांत कार्यकर्त्यांनी विजय साजरा केला. कोथरूडमधील रस्त्यांवरही विजयाचे अभिनंदन करणारे फलक लागले होते.

गरवारे महाविद्यालय ते कर्वे पुतळ्यापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात बॅनर झळकले. दुचाकीवर भाजपचा झेंडा लावून कार्यकर्ते ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत होते. भाजप संपर्क कार्यालयातही कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. कर्वे रस्त्यावरील मृत्युंजय मंदिरासमोरील मोहोळ यांच्या संपर्क कार्यालयाजवळ स्पीकर्स लावून कार्यकर्ते नाचून आनंद व्यक्त करत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दंड की चेष्टा? BMC अधिकाऱ्यांना हायकोर्टानं ठोठावला ११ रुपयांचा दंड, २ दिवसाची दिलीय मुदत; प्रकरण काय?

Kolhapur Prisedant : पहिल्या अध्यक्षपदासाठी भाजप आग्रही; सव्वा वर्षाचा कालावधी, महायुतीतील सर्वच घटक पक्षांना मिळणार संधी

UPI Transaction : UPI लिमिटमुळे पेमेंट फेल? जाणून घ्या कशी वाढवायची व्यवहार मर्यादा

घराबाहेर येताच ओमकार आणि आयुषमध्ये हाणामारी, नॉमिनेट का केलं? म्हणत ओमकार धावून गेला आयुषच्या अंगावर, Viral Video

8th Pay Commission च्या नावाखाली मोठी फसवणूक; चुकूनही डाउनलोड करू नका 'हे' नवीन अ‍ॅप, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी धोक्याची घंटा

SCROLL FOR NEXT