Pune Loksabha sakal
लोकसभा २०२४

Prakash Javadekar : काँग्रेसकडून हताशपणे खोटा प्रचार सुरू ; प्रकाश जावडेकर,केंद्र सरकारकडून ३० कोटी तरुणांना रोजगार

‘‘मोदी सरकारने गेल्या १० वर्षांत पायाभूत सुविधांसह दळणवळणाच्या सुविधांमध्ये सुधारणा केली आहे. ३० कोटी तरुणांना रोजगार दिला. दरवर्षी दीड कोटी भविष्यनिर्वाह निधीची खाती उघडली जात आहेत. मोदी सरकारच्या विरोधात बोलण्यासाठी कोणताही मुद्दा नसलेल्या काँग्रेसकडून हताशपणे खोटा प्रचार केला जात आहे,’’

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘‘मोदी सरकारने गेल्या १० वर्षांत पायाभूत सुविधांसह दळणवळणाच्या सुविधांमध्ये सुधारणा केली आहे. ३० कोटी तरुणांना रोजगार दिला. दरवर्षी दीड कोटी भविष्यनिर्वाह निधीची खाती उघडली जात आहेत. मोदी सरकारच्या विरोधात बोलण्यासाठी कोणताही मुद्दा नसलेल्या काँग्रेसकडून हताशपणे खोटा प्रचार केला जात आहे,’’ अशी टीका भाजपचे माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत त्यांचे मुद्दे मांडले. या वेळी समन्वयक संदीप खर्डेकर, संजय मयेकर, हेमंत लेले, पुष्कर तुळजापूरकर, शैलेश बडदे उपस्थित होते. जावडेकर म्हणाले, ‘‘ही निवडणूक म्हणजे खरे काम आणि खोटा प्रचार यांच्यातील लढाई आहे.

सरकारने गेल्या १० वर्षांत देशांतील लोहमार्गांचे जाळे दुप्पट केले. पाच हजार स्थानके बांधली. रेल्वेचे पाचपट विद्युतीकरण केले. देशात ७४ विमानतळ होती, आता ती १६९ झाली आहेत. प्रतिदिन ३० किलोमीटर लांबीचे महामार्ग तयार केले जात आहेत. घरोघरी स्वच्छतागृह, डीबीटीमुळे लाभार्थ्यांना थेट योजनांचा लाभ तसेच डिजिटल इंडियामुळे इंटरनेटचे जाळे विस्तारले.

’’ मुद्रा योजनेद्वारे दहा हजार कोटी रुपयांची कर्जे दिली आहेत. एकूण ३० कोटी तरुणांना रोजगार दिला असून, दहा लाख जणांना सरकारी नोकऱ्या मिळाल्या आहेत.’’नरेंद्र मोदी सरकारने अनेक कामे केली आहेत. त्यामुळे भाजप ४०० पेक्षा जास्त जागा देशात जिंकणार आहे. पण विरोधकांकडे मुद्दा नसल्याने खोटा प्रचार करून जागा कमी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीकाही जावडेकर यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Local Train: दिवसभरात १,४१४ लोकल फेऱ्या अन्...; गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेचा दिलासादायक निर्णय

अजितदादांच्या निधनानंतर त्याच दिवशी मंत्रालयातून ७५ शाळांना अल्पसंख्यांक दर्जा; एकाच संस्थेच्या २८ शाळा

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

Nashik Ration Shops : ग्रामपंचायती अन् बचत गटांची प्रतीक्षा संपणार कधी? नवीन रेशन परवान्यांसाठी नाशिककर आक्रमक

Pune News: वारज्यात महामार्गाचीच कोंडी! दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतो दीड तास; काय आहेत काेंडीची कारणे..

SCROLL FOR NEXT