Rahul Gandhi and Akhilesh Yadav Interview sakal
लोकसभा २०२४

Rahul Gandhi and Akhilesh Yadav Interview : राहुल गांधींनी घेतली अखिलेश यांची मुलाखत;फुलपूरच्या सभेतील संवाद ‘व्हायरल’

उत्तर प्रदेशातील फुलपूर मतदारसंघात काँग्रेस नेते राहुल गांधी व समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची सभा होती; परंतु लोकांच्या गर्दीमुळे आणि अचानक ध्वनिव्यवस्था कोलमडल्याने दोघांची भाषणे होऊ शकली नाहीत.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील फुलपूर मतदारसंघात काँग्रेस नेते राहुल गांधी व समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची सभा होती; परंतु लोकांच्या गर्दीमुळे आणि अचानक ध्वनिव्यवस्था कोलमडल्याने दोघांची भाषणे होऊ शकली नाहीत.

शेवटी अखिलेश यादव यांनी व्यासपीठावर संभाषण करण्याची सूचना राहुल गांधी यांना केली. राहुल यांनी अखिलेश यांची सूचना मान्य केली व विविध प्रश्न विचारून अखिलेश यांना बोलते केले. हाच संवाद सध्या सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला.

फुलपूर हा पंडित जवाहरलाल नेहरू यांचा मतदारसंघ राहिला असला तरी यावेळी या मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे उमेदवार रिंगणात आहेत. यावेळी अखिलेश यादव यांनी आमची लढाई केवळ वाराणसीमध्ये आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथील नागरिकांना वाराणसी क्योटो शहरासारखे करण्याचे आश्वासन दिले होते.

आता वाराणसीची क्योटो झाले की नाही, हे तेथील मतदार ठरविणार आहेत. परंतु वाराणसीमधील युवक बेरोजगार आहे, अग्निवीर योजनेमुळे तरुणांमध्ये असंतोष आहे. युवकांचे हात रिकामे असल्याचा दावा अखिलेश यादव यांनी केला.

‘खटाखट खटाखट’चा प्रयोग

राहुल गांधी यांच्या ‘खटाखट खटाखट’ या शब्दाचा उच्चारही अखिलेश यांनी केला. पंतप्रधान आता आपल्या भाषणांमध्ये ‘खटाखट खटाखट’ शब्द वापरत असल्याचे सांगितले. राहुल गांधी यांनी मुलायमसिंह यादव यांचीही आठवण काढली.

आपण त्यांच्यापासून काय धडे घेतले, असा प्रश्न अखिलेश यांना विचारला. आपण त्यांच्याकडून कुस्तीचे धडे गिरवले काय, असाही प्रश्न त्यांनी केला. यावर अखिलेश यादव म्हणाले, माझे शिक्षण एका सैनिक स्कूलमध्ये झाले आहे. त्यामुळे कुस्तीचे धडे गिरवू शकलो नाही. परंतु कुस्तीमुळे त्यांचे जमिनीशी नाते राहिले आहे. त्यामुळेच लोक त्यांना धरतीपुत्र म्हणत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Strait of Hormuz: 'होर्मुझ'चं सोडा, इराणची नवीनच खेळी; अरबी समुद्रापर्यंत ‘रेस्ट्रिक्टेड झोन’ करण्याची योजना, जगावर नवं संकट

SCROLL FOR NEXT