Rahul Gandhi  sakal
लोकसभा २०२४

Rahul Gandhi : सत्तेत आल्यास भाजप घटना फाडून फेकेल ; काही उद्योगपतींनी देश चालवावा अशी सत्ताधाऱ्यांची इच्छा

‘‘गरीब, दलित, ओबीसी आणि अनुसूचित जाती-जमातींना त्यांचा हक्क मिळवून देणारी राज्यघटना, भाजप पुन्हा सत्तेत आल्यास फाडून फेकून देईल,’’ असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी मध्य प्रदेशातील भिंड येथे घेण्यात आलेल्या सभेत केला.

सकाळ वृत्तसेवा

भिंड : ‘‘गरीब, दलित, ओबीसी आणि अनुसूचित जाती-जमातींना त्यांचा हक्क मिळवून देणारी राज्यघटना, भाजप पुन्हा सत्तेत आल्यास फाडून फेकून देईल,’’ असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी मध्य प्रदेशातील भिंड येथे घेण्यात आलेल्या सभेत केला.

राहुल गांधी यांनी या सभेदरम्यान, राज्यघटनेची प्रतही आणली होती. ती प्रत दाखवत राहुल म्हणाले की, यंदाची निवडणूक ही सामान्य नसून दोन विचाधारांमधील ही लढाई आहे. ‘‘राज्य घटनेमुळेच गरीब, ओबीसी, आदिवासी आणि अनुसूचित जातींमधील व्यक्तींना मनरेगासारखी योजना, जमिनीचे हक्क, आरक्षण आणि अन्य गोष्टी मिळाल्या आहेत.’’ मात्र भाजप पुन्हा सत्तेत आल्यास गृहमंत्री अमित शहा आणि त्यांच्या खासदारांचा राज्यघटना फाडून फेकून देण्याचा मानस आहे. केवळ २०-२५ उद्योगपतींनी हा देश चालवावा अशी भाजपची इच्छा, असा दावा राहुल यांनी केला आहे.

आरक्षणावरूनही हल्लाबोल

राहुल गांधी यांनी आरक्षणावरूनही केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. सत्ताधारी पक्ष दावा करत आहे की, ते आरक्षणाविरोधात नाहीत, पण असे असेल तर त्यांनी रेल्वे आणि त्यासारख्या अन्य सार्वाजनिक उद्योगधंद्यांचे खासगीकरण का सुरू केले आहे, असा सवाल राहुल यांनी उपस्थित केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आले तर ते २२-२५ उद्योगपतींना अब्जाधीश बनवतील; पण काँग्रेस सत्तेत आल्यास कोट्यवधी महिलांना लखपती बनवेल.

-राहुल गांधी, काँग्रेसचे नेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI व्यवहारांवर द्यावे लागणार शुल्क; नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचे संकेत, कारणही सांगितलं...

Karmad News : उघड्या लिफ्टमधून बियाण्याची पोती नेताना तरुणाचा मृत्यू; कंपनी मॅनेजर, एचआर अधिकारी व कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा

Delhi Police IPS Transfers : दिल्ली पोलिस दलात मोठा फेरबदल; 5 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती? पाहा बदल्यांची यादी

Bogus Doctor Crime : वारजे, खराडीत बोगस डॉक्टरांवर कारवाई; मनपाच्या बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध समितीची कारवाई

Latest Marathi News Live Update : मनमाड रेल्वे स्थानकात माथेफिरूचा धुमाकूळ; प्रवाशांवर दगडफेक, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT