Raigad Constituency Lok Sabha Election Result esakal
लोकसभा २०२४

Raigad Constituency Lok Sabha Election Result: अजित पवारांचा एकमेव सुभेदार रायगडमध्ये विजयी! अस्तित्वाच्या लढाईत गितेंचा पराभव

Sunil Tatkare Won Raigad Lok Sabha Election Result 2024 : रायगड लोकसभा मतदारसंघात मुस्लिम मतदारांना जवळ करण्यासाठी राम मंदिराचा मुद्दा बाजूला राहिला. तसेच वाद विसरुन अनंत गीते व जयंत पाटील एकत्र आल्याने शिवसेना ठाकरे गट ताकद होती.

Sandip Kapde

रायगड लोकसभा मतदार संघावर देशाचे लक्ष होते. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट विरुद्ध उद्धव ठाकरे यांची शिवसेना अशी लढत येथे होती. दरम्यान अजित पवारांचा एकमेव सुभेदार सुनिल तटकरे रायगडमध्ये विजयी झाले आहेत. सुनिल तटकरे ८२ हजार ७८४ मतांनी विजयी झाले आहेत. तटकरे यांना ५ लाख ०८ हजार ३५२ मते मिळाली.

ठाकरे गटाचे अनंत गिते यांना ४ लाख २५ हजार ५६८ मते मिळाली आहेत. वंचित बहुजन आघाडीला इशं १९ हजार ६१८ मते मिळाली.

रायगड लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यात मतदान झाले. या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना, असा सामना होता. खासदार सुनील तटकरे तर माजी खासदार अनंत गिते हे मैदानात होते. दोघांसाठी ही लढाई अस्तित्वाची होती. त्यामुळे या मतदारसंघात काटे की टक्कर पाहायला मिळाली. या लोकसभा निवडणुकीत गेल्या निवडणुकीप्रमाणे मतदानाचा टक्का काहीसा कायम राहीला.

विधानसभा मतदारसंघ -

रायगडमधील अलिबाग, पेण, श्रीवर्धन, महाड, तर रत्नागिरीतील दापोली, राजापूर असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ रायगड लोकसभा मतदारसंघात मोडतात. यामध्ये तीन आमदार शिंदे गटाचे, तर ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि भाजपचा प्रत्येकी एक-एक आमदार आहे. यावरुन लक्षात येते की पक्षफुटीआधी एकट्या शिवसेनेचे चार आमदार इथे होते. म्हणजे, शिवसेनेची ताकद होती. मात्र, आता शिवसेनेतच फूट पडल्यानं ती ताकदही विभागली गेली.

या मुद्द्यांवर गाजली निवडणूक -

रायगड लोकसभा मतदारसंघात मुस्लिम मतदारांना जवळ करण्यासाठी राम मंदिराचा मुद्दा बाजूला राहिला. तसेच वाद विसरुन अनंत गीते व जयंत पाटील एकत्र आल्याने शिवसेना ठाकरे गट ताकद होती. मागील १४ वर्षापासून सुरु असलेले मुंबई-गोवा महामार्गाचे अपुरे काम देखील या निवडणुकीत चर्चेत आले.

जिल्ह्यातून परत गेलेले मोठे औद्योगिक प्रकल्प यामुळे मोठी बेरोजगारी देखील वाढली आहे. रायगड जिल्ह्यात जलजीवनाची निकृष्ट कामे झाली. त्यामुळे पाणीटंचाई दूर करण्यात मोठे आपयश आले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Northeast India Earthquake: ईशान्य भारत भूकंपाने हादरला, बंगालपासून भूतानपर्यंतही जाणवले धक्के

Latest Marathi News Updates: सुरगाण्यात १९ ते २१ सप्टेंबर दरम्यान ICH महोत्सव

IND vs AUS, ODI: स्मृती मानधनासह दोघींची अर्धशतकं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध इतिहासात पहिल्यांदाच घडला 'असा' पराक्रम

MP Dhairyasheel Patil: उजनी प्रदूषणाबाबत केंद्र सकारात्मक, राज्य शासन उदासीन: खासदार धैर्यशील मोहिते-पाटील;'आगामी निवडणुका मविआ एकत्रितच लढणार'

Ayush Komkar प्रकरण पोलिसांची मोठी कारवाई, पण मास्टरमाईंड अजूनही फरार..| Andekar Toli | Sakal News

SCROLL FOR NEXT