Raju Shetti sakal
लोकसभा २०२४

Raju Shetti : हातकणंगलेत भाजपच्या उमेदवाराचा पराभव करायचा असेल, तर मविआ आम्हाला पाठिंबा देईल ; राजू शेट्टी

महाविकास आघाडीला भाजपच्या उमेदवाराचा हातकणंगले लोकसभा मतदारसंघात खरोखरच पराभव करायचा असेल तर ते आम्हाला पाठिंबा देतील. आणि तरीही महाविकास आघाडीने हातकणंगलेत उमेदवार दिलाच तर त्याचा मला थोडा त्रास होईल

- शांताराम पाटील

इस्लामपूर : महाविकास आघाडीला भाजपच्या उमेदवाराचा हातकणंगले लोकसभा मतदारसंघात खरोखरच पराभव करायचा असेल तर ते आम्हाला पाठिंबा देतील. आणि तरीही महाविकास आघाडीने हातकणंगलेत उमेदवार दिलाच तर त्याचा मला थोडा त्रास होईल पण सर्वसामान्य मतदारांच्या जीवावर मी हातकणंगले मतदारसंघातून विजयी नक्कीच होणार अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी यांनी इस्लामपूर येथे पत्रकार बैठकीत मांडली.

ते म्हणाले, महाविकास आघाडीचा सर्वात मोठा शत्रू बीजेपी आहे. आणि आम्हालाही शेतकरी विरोधी भाजपाचा पराभव करायचा आहे त्यामुळे दोन्हींचेही विचार एक असल्याने महाविकास आघाडी मला पाठिंबा देईल अशी खात्री आहे. मी गेली 22 वर्षे राजकारणात आहे विधानसभा आणि लोकसभा निवडणूक लढल्या आहेत. अजूनही या मतदार संघातील सर्वसामान्य लोक ५० रुपये पासून त्यांच्या मनाला येईल, त्यांच्या ऐपतीप्रमाणे निवडणुकीसाठी पैसे देतात. यातूनच माझ्या बाबतीत सर्वसामान्य मतदारांची असलेली भूमिका लक्षात येते.

मी कोणत्याही आघाडीत न जाता स्वतंत्र निवडणूक लढवावी असे आमच्या पक्षाच्या कार्यकारणीच्या बैठकीत ठरले आहे कार्यकारणीच्या बैठकीप्रमाणे माझी वाटचाल सुरू आहे. त्यामुळे मी महाविकास आघाडीत किंवा कोणत्याही राजकीय पक्षा बरोबर निवडणूक न लढता स्वतंत्रच निवडणूक लढवणार आहे .आणि तरीही याबाबत काही ठरवायचे झाले तरी मला आमची कार्यकारणी बोलवावी लागेल , लोकांचा विचार घ्यावा लागेल कार्यकारणीच्या विचाराशिवाय मी कोणतेही पाऊल उचलणार नाही.

ते म्हणाले,भाजपा सरकार शेतकरी विरोधी आहे.शासनाने आणलेल्या शेतकरी कायद्याच्या विरोधात लढताना ७५० शेतकरी बळी पडले आहेत.याचा आम्हाला कदापही विसर पडणार नाही.त्यामुळे बीजेपी चा उमेदवार पराभूत करायचा असेल तर महाविकास आघाडी उमेदवार देणार नाही. यावेळी ॲड एस .यु.संदे, भागवत जाधव,कोल्हापूर चे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT