ranchi jharkhand lok sabha election congress youth in politics Sakal
लोकसभा २०२४

लक्षवेधी लढत : रांची (झारखंड) काँग्रेसच्या युवा चेहऱ्याचा निभाव लागणार का?

राम तहल चौधरी यांनी १९९१ मध्ये पहिल्यांदा भाजपला येथे यश मिळवून दिले. त्यानंतर सलग चार निवडणुका ते येथून जिंकले.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांपासून रांची या लोकसभा मतदारसंघावर भाजपने स्थापित केलेले वर्चस्व मोडून काढणे काँग्रेसच्या तरुण उमेदवाराला कठीण जाणार असल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या ३० वर्षांपासून भाजपने रांची या झारखंडच्या राजधानीच्या शहरावर आपले वर्चस्व राखले आहे.

राम तहल चौधरी यांनी १९९१ मध्ये पहिल्यांदा भाजपला येथे यश मिळवून दिले. त्यानंतर सलग चार निवडणुका ते येथून जिंकले. त्यानंतर दोन वेळा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुबोध कांत सहाय यांनी येथून विजय मिळवला. ते केंद्रात मंत्री सुद्धा होते.

परंतु २०१४ व २०१९ मध्ये त्यांना सलग दोन वेळा पराभवाचा सामना करावा लागला. यावेळी त्यांच्या कन्या यशस्विनी सहाय या युवा चेहऱ्याला काँग्रेसने संधी दिली आहे. यशस्विनी सहाय या मुंबईत वकिली करतात. त्या केवळ २७ वर्षांच्या आहेत. आता निवडणुकीसाठी रांचीत आल्याने मतदारांवर त्या किती प्रभाव पाडतील, हे निकालानंतरच दिसून येईल.

सलग दोन वेळा भाजपने या मतदारसंघातून यश मिळविले आहे. यावेळीही संजय सेठ यांनाच भाजपने पुन्हा उमेदवारी दिली आहे. भाजपचे खासदार म्हणून पाचवेळा प्रतिनिधित्व केलेले राम तहल चौधरी यांनी आता राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने भाजपची काहीशी अडचण झाली आहे.

परंतु आता त्यांचा मतदारांवर फारसा प्रभाव राहिलेला नसल्याचा दावा भाजपतर्फे करण्यात येत आहे. भाजपचा प्रभाव या मतदारसंघावर कायम राहिल्याने आपले वर्चस्व कायम राखण्यात भाजपला कठीण जाणार नाही, असे पक्षाच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. काँग्रेसची सारी भिस्त या मतदारसंघातील १३ टक्के मुस्लिम तसेच १२ टक्के दलित आणि ख्रिश्चन मतदारांवर अवलंबून आहे.

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना तुरुंगात टाकल्यानंतर त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांनी प्रचाराची आघाडी सांभाळली आहे. रांचीतील इंडिया आघाडीच्या उलगुलान रॅलीलासुद्धा चांगलाच प्रतिसाद मिळाला, ही काँग्रेस उमेदवारासाठी दिलासादायक बाब आहे. तरीही भाजपचा गड सर करणे काँग्रेसला सोपे नक्कीच नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill on IND vs SL Draw: "२५० षटकं अन् सलग तीन दिवस फिल्डिंग..." फॉलोऑननंतरही सामना ड्रॉ राहिल्याबद्दल गिल काय म्हणाला?

Marathi News Live Updates : नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 प्रवाशांचा पुढचा प्रवास सुरू

Manora News : कृषी केंद्राचा परवाना रद्द न करण्यासाठी २५ हजारांची लाच; मंडळ कृषी अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Hotel Business : हॉटेल व्यवसायाला ग्राहकांच्या अविश्वासाचा फटका! एफडीए कारवाईनंतर शहरातील रेस्टॉरंटमध्ये २० टक्क्यांपर्यंत घट

Pune News : स्थायी समितीतील निर्णय फिरवला! टक्केवारीच्या ‘दुर्गंधी’ने स्वच्छ सेवक साहित्याविना

SCROLL FOR NEXT