Loksabha Election 2024 sakal
लोकसभा २०२४

Loksabha Election 2024 : रश्मी बर्वे यांची संधी हुकली; श्‍याम बर्वेच उमेदवार

जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रश्‍मी बर्वे यांच्या जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अंतरिम स्थगिती दिली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रश्‍मी बर्वे यांच्या जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अंतरिम स्थगिती दिली आहे. यामुळे बर्वे यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरीही आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमामध्ये हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिल्याने रामटेक लोकसभा मतदारसंघातून त्यांचे पती श्‍याम बर्वेच उमेदवार म्हणून कायम राहतील, हे स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणावर न्या. अविनाश घरोटे आणि न्या. मुकुलीका जवळकर यांच्या समक्ष सुनावणी झाली. याचिकेनुसार, सुनील साळवे यांनी माहिती अधिकारामध्ये रश्‍मी बर्वे यांच्या जात पडताळणी प्रमाणपत्रासाठीच्या दस्तऐवजाविषयी माहिती मागविली होती. त्याविरोधात बर्वे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

उच्च न्यायालयातील हे प्रकरण निकाली लागले त्याच दिवशी २२ मार्च रोजी सामाजिक न्याय विभागाने जात पडताळणी समितीला बर्वे यांच्या दस्तऐवजाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यावर समितीने त्यांना अवघ्या २४ तासांत उत्तर सादर करण्याचे आदेश दिले होते. रश्‍मी बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र समितीने २८ मार्च रोजी रद्द केले होते.

त्याला बर्वे यांनी उच्च न्यायालयात आव्हान देत हे नैसर्गिक न्याय नियमांच्या विरुद्ध असल्याचा आरोप केला होता. तसेच, प्रमाणपत्र रद्द करण्याच्या निर्णयासह रद्द केलेल्या उमेदवारी अर्जाच्या निर्णयावर स्थगिती देत निवडणूक लढण्याची संधी द्यावी अशी विनंती उच्च न्यायालयाला केली होती. पंजाब राज्य विरुद्ध देविंदर सिंग आणि लेह लडाख या दोन्ही प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा दाखला बर्वे यांचे वकील ॲड. नारनवरे यांनी दिला. या निर्णयानुसार न्यायालयाने समितीच्या मूळ निर्णयाला स्थगिती दिल्यास त्या निर्णयाच्या आधारे यापूर्वी प्रशासनाने केलेली प्रक्रिया, घेतलेले निर्णय आपोआप रद्द होतील. बर्वे यांच्या बाबतीत देखील हेच झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १४ विधेयकं मांडली, १२ मंजूर; चर्चेच्या वेळेत अन् प्रश्नोत्तरात कामकाज नापास

बेस्ट पतपेढीत एकही जागा नाही, राज ठाकरे म्हणाले,'मला माहितीच नाही विषय, छोटी गोष्ट आहे रे'

'हा' प्रसिद्ध राजकीय नेता अभिनेत्रीला करायचा अश्लिल मॅसेज, म्हणायचा..'हॉटेलवर चल' अभिनेत्रीने केला धक्कादायक अनुभव शेअर

माझ्या मुलाने आणखी काय करायला हवं? श्रेयस अय्यरला Asia Cup 2025 संघात संधी नाही मिळाली; वडिलांना राग अनावर

Crime News : तरुणाने आई-वडिल अन् भावाची केली हत्या; मित्राला म्हणाला- अख्खं कुटुंबच संपवलं, आता इथून पुढे...

SCROLL FOR NEXT