Loksabha Election 2024  sakal
लोकसभा २०२४

Loksabha Election 2024 : केवळ घोषणा, अंमलबजावणी नाहीच ; जाहीरनाम्यांपासून ‘ज्येष्ठ’ दूरच असल्याची खंत

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांनी जाहीर केलेल्या जाहीरनाम्यांपासून आपण दूरच आहोत, अशी खंत ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली आहे. निवडणुकांत मताच्या आमिषाने दिलेली आश्वासने आणि राज्य व केंद्र सरकारच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या योजना या दोन्ही बाबी ऐकायला व वाचायला खूप छान वाटतात.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांनी जाहीर केलेल्या जाहीरनाम्यांपासून आपण दूरच आहोत, अशी खंत ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली आहे. निवडणुकांत मताच्या आमिषाने दिलेली आश्वासने आणि राज्य व केंद्र सरकारच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या योजना या दोन्ही बाबी ऐकायला व वाचायला खूप छान वाटतात. मात्र जाहीरनाम्यातील आश्वासनांची पूर्तता होत नाही. तर सरकारच्या योजनांची अंमलबजावणी झालेली नाही, अशी खंत ज्येष्ठांना वाटते.

ज्येष्ठांना खूष करून त्यांची मते मिळवण्यासाठी आत्तापर्यंतच्या विविध निवडणुकांमध्ये अनेक आश्वासने देण्यात आली आहेत. मात्र त्यांची पुर्तता होत नाही. यावेळच्या जाहीरनाम्यांत ज्येष्ठांसाठी ठोस आश्वासनेही दिसत नाहीत. ज्येष्ठांचे आयुष्य सुखकर व्हावे म्हणून राज्य आणि केंद्र सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत.

मात्र त्यांची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे ज्येष्ठांचे प्रश्न जैसे थे आहेत. याचा गांभीर्याने विचार करायला हवा, अशी अपेक्षा ज्येष्ठांसाठी कार्यरत असलेल्या ‘जनसेवा फाउंडेशन’ने व्यक्त केली आहे. ज्येष्ठांना मदत आणि मार्गदर्शन मिळावे म्हणून केंद्र आणि राज्य सरकारने हेल्पलार्इन सुरू केली आहे. त्यातील राज्याच्या हेल्पलार्इन प्रतिसाद आहे.

मात्र केंद्राची हेल्पलार्इन गेल्या दीड महिन्यांपासून बंद आहे. सरकार ज्येष्ठांच्या प्रश्नांबाबत किती गंभीर आहे, हे यातून दिसते. तशीच परिस्थिती जाहीरनाम्यांच्या बाबतीतही आहे. ज्येष्ठांच्या प्रश्नांचा समाजाने गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.

- पांडुरंग खाडे, ज्येष्ठ नागरिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! कोटपा कायदा अधिक कठोर करणार; तंबाखू विक्री आणि प्रचारावर कडक नियंत्रण येणार

Video: मला टी२० मध्ये २०० धावा करायच्यात...' वैभव सूर्यवंशीने पीटरसनसमोरच थेट सांगितलं; गेलच्या विक्रम मोडायचीही भाषा

Savarkar Defamation: सावरकर बदनामी प्रकरणात समाज माध्यम, सर्च इंजिन व वृत्तपत्राविरोधात अटक वॉरंटची मागणी; सात्यकी सावरकरांचा न्यायालयात अर्ज

हा पठ्ठ्या शॉपिंगच्या बॅगा उचलायचे घेतो ₹149! दिल्लीतील ‘कॅरीमेन’नं तर नवऱ्यांचंच काम केलं सोपं!” सोशल मीडियावर Viral

नवी मुंबईकरांनो तयारीत रहा! महापालिकेकडून १०% पाणी कपात लागू; आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार

SCROLL FOR NEXT