Ajit Pawar sakal
लोकसभा २०२४

Ajit Pawar : दलित-मुस्लिमांची नाराजी हटवा;राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत आमदारांना सूचना

लोकसभा निवडणुकीतील अपयशाचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी बोलाविलेल्या बैठकीत मुस्लिम आणि दलित समाजापर्यंत पोचण्यासाठी प्रयत्न करण्यासह मराठा आरक्षण आणि शेतकऱ्यांशी संबंधित नाराजी दूर करण्याबाबत आमदारांना सूचना देण्यात आल्या.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : लोकसभा निवडणुकीतील अपयशाचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी बोलाविलेल्या बैठकीत मुस्लिम आणि दलित समाजापर्यंत पोचण्यासाठी प्रयत्न करण्यासह मराठा आरक्षण आणि शेतकऱ्यांशी संबंधित नाराजी दूर करण्याबाबत आमदारांना सूचना देण्यात आल्या.

या बैठकीत सर्व आमदारांकडून त्यांच्या मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक यांच्या प्रचार मुद्द्यांमध्ये फरक असतो. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी स्थानिक मुद्द्यांवर भर देवून दलित-मुस्लिम समाज जोडण्यावर भर देण्याबाबत सांगण्यात आले. त्याचबरोबर शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न करण्याबाबत यावेळी ठरविण्यात आले.

विधानसभेची तयारी करा

लोकसभा निवडणुकीत झालेल्या अपयशातून सावरून आता विधानसभेच्या निवडणुकीत चांगल्या पद्धतीने काम करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. मंत्री धर्मराव आत्राम आणि विधानसभा उपसभापती नरहरी झिरवाळ मात्र या बैठकीस अनुपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला चार जागा देण्यात आल्या होत्या. यापैकी केवळ रायगड लोकसभा मतदार संघात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा विजय झाला. तर बारामती, शिरूर आणि धाराशिव या मतदार संघांत दारुण पराभव पत्करावा लागला. त्यामुळे पक्षात नैराश्याचे वातावरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांचे १८ आमदार संपर्कात असल्याचे सांगून आणखी अस्वस्थता निर्माण केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आदी उपस्थित आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT