Mayawati  sakal
लोकसभा २०२४

Mayawati : मायावतींकडून एका दगडात दोन शिकार;भाचा आकाश आनंद यांना हटवून घराणेशाहीचा शिक्का पुसला

उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्षाच्या (बसप) सर्वेसर्वा मायावती यांनी त्यांचे राजकीय वारसदार आणि भाचे आकाश आनंद यांची पक्षाच्या राष्ट्रीय समन्वयकपदावरून उचलबांगडी केल्याने खळबळ निर्माण झाली आहे. मायावतींच्या या निर्णयावरून तर्कवितर्क लढविले जात आहेत.

सकाळ वृत्तसेवा

लखनौ : उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्षाच्या (बसप) सर्वेसर्वा मायावती यांनी त्यांचे राजकीय वारसदार आणि भाचे आकाश आनंद यांची पक्षाच्या राष्ट्रीय समन्वयकपदावरून उचलबांगडी केल्याने खळबळ निर्माण झाली आहे. मायावतींच्या या निर्णयावरून तर्कवितर्क लढविले जात आहेत.

पक्षामध्ये कारवाई केली जात असताना सामान्य कार्यकर्ते आणि आपले नातेवाईक यांना वेगळा न्याय नसल्याचा संदेश मायावतींनी दिला आहे. मायावतींनी आकाश आनंद यांना राजकीय वारसदार म्हणून घोषित केल्यानंतर ‘बसप’वर घराणेशाहीचा आरोप होऊ लागला होता.

भाजपने हाच मुद्दा प्रचारामध्ये लावून धरला होता. दुसरीकडे आकाश यांनीही भाजपवर जाहीर सभांतून तोंडसुख घ्यायला सुरूवात केली होती. आधीच भाजपबाबत मवाळ भूमिका घेणाऱ्या बहनजींना भाच्याची आक्रमक भूमिका रुचली नाही.

सीतापूर येथील सभेतील भाषणानंतर आकाश यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला होता. सध्या भाजपसोबत गेलेल्या बिगर जाटव दलित मतदारांमध्येही अस्वस्थता निर्माण झाली होती. ही नाराजी मायावतींच्या कानी घालण्यात आल्यानंतर त्यांनी थेट आकाश आनंद यांच्यावरच कारवाई केली. मायावतींनी आकाश आनंद यांच्या राज्यातील सर्वच सभाच रद्द केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

FDA Crime : ‘क्रीमी डिलाइट’, महावीर डेअरीवर एफडीएची कारवाई; लाखो रुपयांचे पदार्थ आढळले असुरक्षित

Teachers Agitation : सामूहिक रजा घेत शिक्षकांचे आंदोलन; पंचायत समितीवर मोर्चा, पाच तास धरणे आंदोलन, मुख्यालयाची अट शिथिल करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT