Loksabha Election 2024 sakal
लोकसभा २०२४

Loksabha Election 2024 : अहमदनगर ४२, तर शिर्डीसाठी ३१ अर्जांची विक्री

लोकसभेच्या अहमदनगर व शिर्डी मतदारसंघासाठी गुरूवार (ता.१८) पासून उमेदवारी अर्ज घेण्यास प्रारंभ झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : लोकसभेच्या अहमदनगर व शिर्डी मतदारसंघासाठी गुरूवार (ता.१८) पासून उमेदवारी अर्ज घेण्यास प्रारंभ झाला आहे. पहिल्याच दिवशी अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी दुपारी तीन वाजेपर्यंत २२ जणांनी ४२ अर्ज घेतले. तर शिर्डीसाठी १८ जणांनी ३१ अर्ज घेतले आहेत.

खासदार डॉ. सुजय विखे, आमदार प्राजक्त तनपुरे, नितीन उदमले आदींसाठी प्रतिनिधींनी अर्ज घेतले आहेत. पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही. अभिजित दिवटे यांनी भाजपचे उमेदवार डाॅ. सुजय विखे यांच्यासाठी २ अर्ज घेतले आहेत.

रावसाहेब शंकर काळे (रा.नालेगाव) यांनी स्वत:साठी एक अर्ज, अनिल गणपत शेकटकर (रा.सिद्धार्थनगर), सुभाष बन्सी अल्हाट (रा. पिंपळगाव उज्जैन्नी,ता. नगर), कालीराम बहिरू पोपळघट (रा. साकूर, ता. संगमनेर) दोन अर्ज, अशोक भानुदास तांबे (सलाबतपूर, ता. नेवासे) यांनी दोन अर्ज, राणू साहेबराव दळवी (मुक्तापूर, नेवासे) यांनी दोन अर्ज, विलास सावजी लाकूडझोडे (उख्खलगाव, श्रीगोंदे) यांनी दोन अर्ज, शिवाजी वामनराव डमाळे (रा.केडगाव), तुकाराम बाबूराव कोकरे (रा.चिंभळा, श्रीगोंदे) दोन अर्ज, अमोल दिगंबर गुलदगड (रा. राहुरी) यांनी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यासाठी ४ अर्ज घेतले आहेत.

शिरीष तुकाराम जाधव (रा. दिल्लीगेट) यांनी १ अर्ज, दत्तात्रय अप्पासाहेब वाघुंडे (रा. साकत) यांनी एक अर्ज, अशोक दामोदर ढोकणे (रा. उंबरे, ता. राहुरी) यांनी एक अर्ज, सुदर्शन लक्ष्मण शितोळे (श्रीरामपूर) यांनी दोन अर्ज, सुधीर नाथा वैरागर (रा. घोडेगाव, ता. नेवासे) यांनी १ अर्ज, मंगल भुजबळ (रा. अहमदनगर) यांनी एक अर्ज, छगन भिकाजी पानसरे (मजले चिंचोली, नेवासे) यांनी ४ अर्ज, ज्ञानदेव कारभारी पाडळे (रा. देवराव, नेवासे) यांनी ४ अर्ज, संजय पांडुरंग अडोळे यांनी २ अर्ज हे नितीन नवनाथ उदमले (रा.पाईपलाईन रस्ता, सावेडी) यांच्यासाठी घेतले. यशंवत राया म्हस्के (रा.श्रीरामपूर) यांनी स्वत:साठी २ अर्ज घेतले.

शिर्डीसाठी १८ उमेदवारांनी घेतले अर्ज

राहाता : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत ३८ शिर्डी (अनुसूचित जाती) लोकसभा मतदारसंघासाठी पहिल्या दिवशी १८ उमेदवारांनी ३१ अर्ज घेतले. एकही अर्ज दाखल झालेला नाही. निवडणुकीची अधिसूचना गुरूवारी (ता. १८) रोजी प्रसिद्ध झाली. निवडणूक निर्णय अधिकारी, ३८ शिर्डी (अ.जा) लोकसभा मतदारसंघाचे कार्यालय, पहिला मजला, राहाता तालुका प्रशासकीय इमारत, राहाता येथे अर्ज उपलब्ध आहेत.

उमेदवारी माघारीनंतर चित्र स्पष्ट

जिल्हाधिकारी कार्यालयातील दुसऱ्या मजल्यावर अधिकारी प्रतिक्षालयात उमेदवारी अर्ज विक्रीसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळेत अर्जाची विक्री सुरू आहे. एका अर्जाची किंमत ५० रूपये आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ता. २५ पर्यंत आहे. उमेदवारी अर्ज हे समक्ष निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करावे लागत आहेत. ता.२६ रोजी छाननी होईल. ता.२९ एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. उमेदवारी अर्ज माघारीनंतर निवडणुकीच्या रिंगणात किती उमेदवार आहेत, हे चित्र स्पष्ट होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT