Sangli Lok Sabha esakal
लोकसभा २०२४

Sangli Lok Sabha : 'विशाल पाटलांना संसदेत पाठवण्याची जबाबदारी शिवसेनेची'; संजय राऊतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीने परस्पर उमेदवार जाहीर केल्याबद्दल आज सकाळी तीव्र नाराजी व्यक्त केली.

अजित झळके

'काँग्रेस, राष्ट्रवादीचे लोक लवकरच प्रचारात सहभागी होतील. कालच माझे आमदार जयंत पाटील यांच्याशी बोलणे झाले आहे.'

सांगली : काँग्रेसचे नेते विशाल पाटील (Vishal Patil) यांना संसदेत पाठवण्याची काळजी आणि पुढाकार शिवसेना घेईल, असा प्रस्ताव शिवसेना नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज सांगलीत पोहचताच दिला. विशाल यांच्याविषयी आस्था आणि प्रेम आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

संजय राऊत आजपासून तीन दिवसांच्या सांगली दौऱ्यावर आले आहेत. कवलापूर विमानतळाच्या जागेवर ते हेलिकॉप्टरने पोहचले. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी चर्चा केली. चंद्रहार पाटील यांचा उल्लेख त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार असा केला. विशाल यांना कोणत्या मार्गाने संसदेत नेणार याविषयी मात्र त्यांनी काही स्पष्ट केले नाही.

ते म्हणाले, ‘‘काँग्रेस, राष्ट्रवादीचे लोक लवकरच प्रचारात सहभागी होतील. कालच माझे आमदार जयंत पाटील यांच्याशी बोलणे झाले आहे. ते दोन दिवसांत कामाला लागत आहेत. काँग्रेसची कामाची पद्धत जरा वेगळी आहे. त्यांची वर्किंग कमिटी आहे. वरिष्ठ नेते आहेत, त्यांचे आदेश यावे लागतात. विश्‍वजीत कदम आमचे आहेत, विशाल पाटील हेही आमचेच आहेत.’’

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीने परस्पर उमेदवार जाहीर केल्याबद्दल आज सकाळी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते आघाडी धर्म पाळत नसल्याची टीका केली. त्यावर श्री. राऊत म्हणाले, ‘‘काँग्रेसने रामटेकची उमेदवारी जाहीर केली आम्ही काही बोललो का? आम्ही कामाला लागलो. आघाडी धर्म सगळेच पाळत आहेत, तेही पाळतील, आम्हीही पाळू.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बँडच्या सादरीकरणासह 'पथसंचलन' आणि ध्वज खाली उतरवण्याचा औपचारिक कार्यक्रम आयोजित केला

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

Video: संपूर्ण 'वंदे मातरम्' गायनावर सोनिया गांधींनी खरंच आक्षेप घेतला होता का? नेमकं काय घडलं? काँग्रेसचं स्पष्टीकरण

महिलांविषयीचा 'तो' प्रश्न आणि स्पर्धकाने खेळ सोडला; बरोबर उत्तराने मिळाले असते ५० लाख; तुम्हाला येतंय का उत्तर?

SCROLL FOR NEXT