Sangli Lok Sabha Constituency esakal
लोकसभा २०२४

Sangli Lok Sabha : चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीवरुन काँग्रेस नेते, कार्यकर्त्यांचा संताप; 'आर-पार'च्या लढाईसाठी नेत्यांना आवाहन

विशाल पाटील यांनी गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर चांगली बातमी मिळेल, अशी आशा व्यक्त केली होती. मात्र ती फोल ठरली.

सकाळ डिजिटल टीम

आमदार विश्‍वजित कदम यांच्या नेतृत्वात ताकदीने दिल्लीपर्यंत पाठपुरावा केला, आग्रह केला, काँग्रेसची जागा आम्ही हातातून सोडणार नाही, अशी भूमिका मांडली. परंतु, धक्का बसेल, असा निर्णय घेतला गेला.

सांगली : महाविकास आघाडीत सांगली लोकसभा मतदार संघ (Sangli Lok Sabha Constituency) शिवसेनेला देण्यात आल्याच्या निर्णयाचे जोरदार पडसाद सांगली शहरासह जिल्ह्यात उमटले. काँग्रेस (Congress) कार्यकर्ते, नेत्यांनी या निर्णयावर संताप व्यक्त केला. ‘आता ‘आर या पार’ची लढाई करू, सांगली काँग्रेस म्हणून लढू आणि जिंकून दाखवू,’ अशी गर्जना करण्यात आली.

‘आमदार विश्‍वजित कदम आणि विशाल पाटील (Vishal Patil) जो निर्णय घेतील, त्याला ताकदीने पुढे नेऊ,’ असा निर्धार करण्यात आला. महाविकास आघाडीची मुंबईत पत्रकार परिषद सुरू असतानाच येथील काँग्रेस कमिटीसमोर कार्यकर्त्यांची गर्दी होऊ लागली. उमेदवारीकडे डोळे लावून बसलेल्या कार्यकर्त्यांची निराशा झाली.

विशाल पाटील यांनी गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर चांगली बातमी मिळेल, अशी आशा व्यक्त केली होती. मात्र ती फोल ठरली. त्याचा तीव्र निषेध करत कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. जिल्हाभरातून कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार विश्‍वजित कदम यांच्या नेतृत्वात ताकदीने दिल्लीपर्यंत पाठपुरावा केला, आग्रह केला, काँग्रेसची जागा आम्ही हातातून सोडणार नाही, अशी भूमिका मांडली. परंतु, धक्का बसेल, असा निर्णय घेतला गेला. त्यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत. भावना तीव्र आहेत. जिल्हा काँग्रेस आणि त्यानंतर तालुका काँग्रेसच्या बैठका घेऊन अंतिम निर्णय करू.

-आमदार विक्रम सावंत, जिल्हाध्यक्ष काँग्रेस

काँग्रेस कार्यकर्त्यांत मोठा असंतोष आहे. वसंतदादांच्या घराण्याचा बदला घेण्याचा प्रयत्न दिसतोय. राजकारणात एकमेकाला बरोबर घेऊन जायचे असते. कुणीतरी डाव ठेवून आमचा काटा काढला आहे का, अशी भावना आमची आहे. पन्नास वर्षे आम्ही राजकारण करतोय, आज पहिलीच वेळ आहे. वसंतदादा महाराष्ट्राचे, देशाचे तिकीट वाटत होते. त्यांच्या नातवाला तिकिटासाठी हात पसरावे लागत आहेत. सांगलीची पत, किंमत कमी करण्याचा डाव आहे.

-पी. एल. रजपूत, ज्येष्ठ कार्यकर्ते

महाविकास आघाडीने घेतलेला निर्णय आमच्यासाठी धक्कादायक आहे. ‘सांगली’ ही काँग्रेसची पारंपरिक जागा आहे. देशातील सर्वाधिक वेळा जिंकलेली जागा आहे. अशा वेळी सांगलीत भाजपला पराभूत करायचे असेल, तर ही जागा काँग्रेसलाच लढली पाहिजे आणि विशाल पाटील, हेच उमेदवार हवेत, शिवसेना पक्षाने हे लक्षात घ्यावे. अजून वेळ गेलेली नाही. शिवसेनेने निर्णय मागे घ्यावा. खासदार संजय राऊत यांनी ग्राऊंड रिपोर्ट पाहिला आहे. आजच्या महाविकास आघाडीच्या बैठकीत झालेला निर्णय म्हणजे पूर्णविराम नाही, तो स्वल्पविराम आहे. आम्ही भांडत राहू. पक्षश्रेष्ठींना आग्रह करत राहू. काँग्रेसचे जिल्ह्यातील नेते एकत्र बसून आम्ही पुढची दिशा ठरवू. राज्यातील नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ. त्यांना काँग्रेसच्या पाठीशी असलेले पारंपरिक मतदार, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या मनातील खदखद सांगू.

-पृथ्वीराज पाटील, काँग्रेस शहर-जिल्हाध्यक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Century : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! KKR विरुद्ध शतकी खेळी अन् आशियात कोणालाच न जमलेला केला पराक्रम...

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला खूप मोठा धक्का! मॅच विनर खेळाडूला दुखापत, उपचारासाठी लंडनला जाणार; स्पर्धेतून माघार निश्चित

IPL 2026 Playoff Scenario: विराट कोहलीचा झंझावात अन् RCB गुणतालिकेत अव्वल! KKR चे आव्हान संपले का? जाणून घ्या समीकरण

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीची पहिली धाव अन् सेलिब्रेशन जणू Century सारखं, चाहत्यांना हसू आवरेना... Viral Video ची मजेशीर गोष्ट

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

SCROLL FOR NEXT