Sangli Lok Sabha  esakal
लोकसभा २०२४

Sangli Lok Sabha : ..तर भाजप उमेदवार संजय पाटलांचा सांगलीत पराभव होईल; माजी राज्यमंत्र्यांचं सूचक विधान

देशात तुम्हाला भाजपचा पाडाव करायचा आहे, तसा आम्हाला सांगलीत भाजपचा उमेदवार पराभूत करायचा आहे.

सकाळ डिजिटल टीम

''चंद्रहार की विशाल, हा महत्त्‍वाचा मुद्दा नाही. मतदारसंघातील वस्तुस्थिती काय आहे, हे तपासून निर्णय घ्या, असा सल्ला मी त्यांना दिला.’’

कवठेमहांकाळ : ‘‘देशात तुम्हाला भाजपचा पाडाव करायचा आहे, तसा आम्हाला सांगलीत भाजपचा उमेदवार पराभूत करायचा आहे. त्यासाठी सांगलीत एकास एक लढत झाली पाहिजे. जमिनीवरील वास्तव तपासून घ्या आणि लवकर महाविकास आघाडीतील वाद मिटवून एक उमेदवार जाहीर करा,’’ अशी सूचना माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे (Ajitrao Ghorpade) यांनी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना केली.

खासदार संजय राऊत यांनी अजितराव घोरपडे यांची येथील दूध संघात भेट घेतली. येथील दूध संघाच्या कार्यालयात संजय राऊत व अजित घोरपडे यांची बंद खोलीत चर्चा झाली. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील (Double Maharashtra Kesari Chandrahar Patil) यांना शिवसेनेकडून (Shiv Sena) उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यानिमित्त चर्चेसाठी राऊत आले होते.

या भेटीबाबत श्री. घोरपडे यांनी ‘सकाळ’शी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘खासदार संजय राऊत यांच्याशी सांगली लोकसभा मतदारसंघाबाबत सविस्तर चर्चा झाली. शिवसेना ताकदीने भाजपचा पराभूत करण्यासाठी काम करत आहे. त्या पद्धतीने सांगलीत भाजपचा उमेदवार पराभूत व्हावी, अशी आमची भूमिका असल्याचे मी स्पष्ट केले. त्यासाठी एकास एक लढत झाली पाहिजे, अशी आग्रही भूमिका घेतली. चंद्रहार की विशाल, हा महत्त्‍वाचा मुद्दा नाही. मतदारसंघातील वस्तुस्थिती काय आहे, हे तपासून निर्णय घ्या, असा सल्ला मी त्यांना दिला.’’

या वेळी प्रा. नितीन बानगुडे-पाटील, चंद्रहार पाटील, जिल्हाप्रमुख संजय विभूते, अभिजित पाटील, बजरंग पाटील, प्रदीप माने, मारुती पवार, दिलीप गिड्डे, अनिल बाबर, सागर शेजाळ, राजू घाडगे, शिवाजी पाटील, पांडुरंग पाटील, तात्यासाहेब नलवडे, तुकाराम पाटील, दिलीप झुरे, बाळासाहेब पाटील उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

५ सामने, ३० चौकार, २९ षटकार अन् ३५५ धावा... Vaibhav Sooryavanshi ची इंग्लंडमधील कामगिरी भारताला विचार करायला लावणारी..

Ramtirth Waterfall : पांढराशुभ्र फेस अन् खळखळणारा आवाज! आंबोलीतील प्रसिद्ध रामतीर्थ धबधबा प्रवाहित; पावसाच्या पाण्यामुळं खुललं सौंदर्य, पर्यटकांची गर्दी

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : मुंबईत मुसळधार पावसाचा विमानसेवेवर मोठा परिणाम; उड्डाणे आणि लँडिंग प्रक्रियेत अडथळे

SCROLL FOR NEXT