Sangli Lok Sabha esakal
लोकसभा २०२४

Sangli Lok Sabha : प्रचाराची धुरा सौभाग्यवतींच्या हाती; खानापुरात ज्‍योती पाटील, पूजा पाटील, दिव्‍या पाटील प्रचारात

महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांची पत्नी दिव्या पाटील याही महिलांशी संवाद साधत आहेत.

दीपक पवार

पती चंद्रहार यांनी कुस्ती क्षेत्रात दिलेल्या योगदानाची माहिती देत सामाजिक क्षेत्रात केलेल्या सार्वजनिक कामांची‌ आठवण करून देत आहेत.

आळसंद : सांगली लोकसभा (Sangli Lok Sabha) मतदारसंघात प्रचाराचा धुरळा उडाला आहे.‌ देश, राज्यपातळीवर नेते प्रचारासाठी येत आहेत. खानापूर तालुका त्यास अपवाद नाही. सर्व उमेदवार मतदारसंघात प्रचारासाठी व्यस्त आहेत. खानापूर तालुक्याची जबाबदारी उमेदवारांनी आपल्या सौभाग्यवतींच्या हाती सोपवली आहे. सौभाग्यवतींनी आपल्या पतीच्या प्रचारासाठी पायाला भिंगरी बांधली आहे.

महायुतीचे उमेदवार संजय पाटील (Sanjay Patil) यांच्या पत्नी ज्योती पाटील या भाळवणी, लेंगरे, पारे, खानापूर महिला मेळावे घेऊन संजय पाटील यांना तिसऱ्यांदा निवडून देण्याचे आवाहन करीत आहेत.‌ त्यांच्यासमवेत विट्याच्या नगराध्यक्षा प्रतिभा पाटील होत्या. सुहास बाबर यांच्या पत्नी प्रा. सोनिया यांनी लेंगरे परिसरात महिलांच्या बैठका घेतल्या आहेत. माजी सभापती मनीषा बागल‌ उपस्थित होत्या.

अपक्ष उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) यांच्या पत्नी पूजा पाटील यांनी खानापूर घाटमाथ्यावरील गावांमध्ये जाऊन महिलांशी संवाद साधत आहेत. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विशाल पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन करीत आहेत. महिलांचे प्रश्न समजून घेत आहेत. महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांची पत्नी दिव्या पाटील याही महिलांशी संवाद साधत आहेत. पती चंद्रहार यांनी कुस्ती क्षेत्रात दिलेल्या योगदानाची माहिती देत सामाजिक क्षेत्रात केलेल्या सार्वजनिक कामांची‌ आठवण करून देत आहेत. बहीण प्राजक्ता पाटील या भाऊ चंद्रहार यांच्या प्रचारात आघाडीवर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Privatization: 'ही' सरकारी बँक होणार खासगी! कधीही घोषणा होण्याची शक्यता, निर्णय अंतिम टप्प्यात

"कोण हिंदू? कोण मुस्लिम?" धर्माच्या भिंती ओलांडून 'बाप्पा' पाकिस्तानात! मूर्ती घडवतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल; Viral Video

रितेश देशमुखने पापाराझीकडून चक्क १०० रुपये उधार घेतले, पण का? अभिनेत्याने सांगितलं रस्त्यावर काय घडलं, म्हणाला-

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT