Prakash Shendge vs Prakash Ambedkar  esakal
लोकसभा २०२४

Sangli Lok Sabha : 'प्रकाश आंबेडकर धनदांडग्यांच्या पाठीशी, त्यांची भूमिका संशयास्पद'; ओबीसी नेते शेंडगेंची टीका

बारामती, पुणे याठिकाणी त्यांनी धनदांडग्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे.

सकाळ डिजिटल टीम

'ओबीसी, बहुजनांच्या न्यायासाठी लोकसभा निवडणुकीत उभा राहिलो. त्यावेळी प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आम्हाला पाठिंबा दिला होता.'

सांगली : ‘‘वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी, बहुजनांऐवजी धनदांडग्यांच्या पाठीशी राहिले आहेत. त्यांची ही भूमिका संशयास्पद आहे,’’ अशी टीका ओबीसी बहुजन पार्टीचे नेते माजी आमदार अपक्ष उमेदवार प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी आज पत्रकार परिषदेत केली. या वेळी आंबेडकर यांचे बंधू रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar) यांनी साथ दिल्याचेही जाहीर केले.

शेंडगे म्हणाले, ‘‘ओबीसी, बहुजनांच्या न्यायासाठी लोकसभा निवडणुकीत उभा राहिलो. त्यावेळी प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आम्हाला पाठिंबा दिला होता. आमच्या पक्षातर्फेही त्यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला होता. त्यांची निवडणूक संपल्यानंतर त्यांनी पाठिंबा काढून घेतला. अपक्ष उमेदवाराचे बंधू भेटल्यानंतर एका तासात हा निर्णय त्यांनी घेतला. त्यांची ही भूमिक संशयास्पद आहे.

बारामती, पुणे याठिकाणी त्यांनी धनदांडग्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. त्याविरोधातच निवडणूक लढतो आहे. मात्र, त्यांनी बंधूंनी आता आम्हाला पाठिंबा दिला आहे.’’ ते पुढे म्हणाले, ‘‘प्रचारावेळी ठिकठिकाणी आमच्यावर हल्ले, अडवणूक केली जात आहे. याविरोधात आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. मात्र, यातील संशयितांवर कारवाई झाली नाही. भविष्यात असे हल्ले झाले तर जशास तसे उत्तर देऊ.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Census 2026 40 Questions List : जनगणनेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय! अनुसूचित जाती-जमाती अन् विशिष्ट जातींची होणार नोंद; पाहा 40 प्रश्नांत काय?

Raj Thackeray : पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडीवरून राज ठाकरे संतापले; म्हणाले- ज्यांना सत्ता दिली त्यांनाच जाब विचारा

Sangli Milk Collection Drop : FDA च्या धाडींमुळे सांगलीतील दुधाचा 'बनावट खेळ' बंद? तब्बल 78 हजार लिटरने दुधाची आवक घटली; पाहा आकडेवारी

Marathi News Live Updates : बीडच्या इमामपूरचंही नाव बदलणार? मंत्री भरत गोगावलेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Shivsena Express: कोकण प्रवास मोफत करता येणार, गणेशोत्सवासाठी मुंबईतून विशेष ट्रेन सुटणार; कुठून आणि कधी?

SCROLL FOR NEXT