Sangli Lok Sabha Sharad Pawar esakal
लोकसभा २०२४

Sangli Lok Sabha : 'सांगली' लढण्यावर काँग्रेस ठाम; शरद पवारांच्या मध्यस्थीकडं लक्ष, वादग्रस्त जागांवर अंतिम तोडगा निघणार?

सांगली लोकसभा (Sangli Lok Sabha) मतदारसंघाबाबत काँग्रेस (Congress) तडजोड करणार नाही.

सकाळ डिजिटल टीम

ठाकरेंसोबत पवार यांची बैठक होणार असून, त्यात राज्यातील सर्वच वादग्रस्त जागांवर अंतिम तोडगा निघेल, अशी माहिती आहे.

सांगली : सांगली लोकसभा (Sangli Lok Sabha) मतदारसंघाबाबत काँग्रेस (Congress) तडजोड करणार नाही. ‘विनिंग मेरिट’च्या आधारावर आम्ही लढत आहोत. शिवसेना पक्षप्रमुखांनी याचा पुनर्विचार करावा, असा निरोप दिल्लीतून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना देण्यात आला आहे. महाविकास आघाडीतील जागा वाटपावरून वाढलेला ताण कमी करण्याची जबाबदारी ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी घेतली आहे.

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी दिल्लीत त्यांची याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. ठाकरेंसोबत पवार यांची बैठक होणार असून, त्यात राज्यातील सर्वच वादग्रस्त जागांवर अंतिम तोडगा निघेल, अशी माहिती आहे. राज्यात महायुतीत विजयी समीकरणांच्या आधारावर दणादण जागा बदलल्या जात आहेत, महाविकास आघाडीने चुकीच्या मुद्यांवर अडून बसू नये, अशी भूमिका महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांनी घेतली आहे.

त्यामळे काल रात्री उशिरापर्यंत किंवा आज (ता. ३) दुपारपर्यंत वादग्रस्त जागांचा निर्णय झाला तरच महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद उद्या होईल, असे सांगण्यात आले. या वेगवान घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर आज आमदार विश्‍वजित कदम, विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील यांनी मुंबई गाठली आहे. त्यांनी सायंकाळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. अंतिम टप्प्यात चर्चा आल्या असताना सांगलीच्या नेत्यांनी प्रदेशवर आपला दबाव कायम ठेवण्याचे सूत्र अवलंबले आहे. त्यासाठी आमदार कदम यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र लिहले आहे. त्याची आज जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

रात्रीत बैठकांचा धडाका

महाविकास आघाडीतील वादग्रस्त जागांवरील चर्चा अंतिम टप्प्यात असताना नेत्यांच्या गुप्त बैठकांचा धडाका सुरू झाला आहे. मुंबई, पुणे हे बैठकांचे केंद्र झाले आहे. शिवसेनेचे नेते काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात आहेत. महाविकास आघाडीच्या अंतिम निर्णयानंतर काय, याची चिंता शिवसेनेलादेखील आहे. सांगलीत काँग्रेसने लढायचे ठरवल्यास शिवसेना आणि उमेदवार चंद्रहार पाटील यांची भूमिका काय राहील, याबाबत खलबते सुरू आहेत. ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली तर काँग्रेस काय भूमिका घेणार, याबाबत उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT