Sangli Lok Sabha Vanchit Bahujan Aghadi leader Prakash Ambedkar esakal
लोकसभा २०२४

Sangli Lok Sabha : 'संविधान रक्षणाच्या लढाईत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू वसंतदादांच्या नातवाच्या पाठीशी उभे'

देशात भाजपचे सरकार संविधान संकटात आणत आहे. शेतकरीहिताला बाधा आणत आहे.

सकाळ डिजिटल टीम

''भाजपचा पराभव करणे हेच वंचित आघाडीचे उद्दिष्ट आहे. सांगलीत विशाल पाटीलच भाजप उमेदवाराचा पराभव करू शकतात.''

सांगली : ‘‘ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीने अखेर आज अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचे नातू संविधान रक्षणाच्या लढाईत वसंतदादा पाटील यांच्या नातवाच्या पाठीशी राहिले आहेत,’’ असे प्रतिपादन ‘वंचित’चे राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले. माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांच्याकडे त्यांनी पाठिंब्याचे पत्र सुपूर्द केले.

साळुंखे म्हणाले, ‘‘सांगली लोकसभा (Sangli Lok Sabha) मतदार संघात वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव सिद्ध झाला आहे. गेल्या निवडणुकीत आमच्या उमेदवाराला तीन लाखांवर मते मिळाली होती. देशात भाजपचे सरकार संविधान संकटात आणत आहे. शेतकरीहिताला बाधा आणत आहे. सामान्यांच्या हिताचे ते रक्षण करत नाही. भाजप सरकारमुळे सर्व घटकांचे आरक्षण धोक्यात आले आहे.

Sangli Lok Sabha Vanchit Bahujan Aghadi

शेतमजूर, कामगार, नवयुवकांचे भवितव्य धोक्यात आहे. युवकांच्या नोकऱ्यांचा प्रश्न गंभीर आहे. देशात जनतेचे प्रश्न असताना भाजपकडून मात्र मोठमोठी आश्वासने दिली जात आहेत. अशावेळी भाजपचा पराभव करणे हेच वंचित आघाडीचे उद्दिष्ट आहे. सांगलीत विशाल पाटीलच भाजप उमेदवाराचा पराभव करू शकतात. त्यासाठी वंचित आघाडीने त्यांना पाठिंबा दिला आहे. आघाडीचे सर्व कार्यकर्ते प्रचारात सक्रीय होणार आहेत.’’

प्रतीक पाटील म्हणाले, ‘‘वसंतदादा आणि यशवंत आंबेडकर स्नेहबंध होते. संविधान वाचविण्यासाठी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याची आवश्‍यकता आहे. भाजपविरोधी लढ्यात ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी विशाल पाटील यांना साथ द्यावी, त्यांच्या पाठीशी राहावे, यासाठी त्यांची भेट घेतली होती. त्यांनी त्याला प्रतिसाद दिल्याबद्दल आभारी आहोत.’’ युवा आघाडीचे अध्यक्ष इंद्रजित घाटे, महावीर कांबळे, राजू मुलाणी, स्वप्नील खांडेकर, नजीर झारी, शहराध्यक्ष इरफान केडीया, जिल्हा महासचिव नवीनकुमार कांबळे, मिलिंद कांबळे, मिरज शहराध्यक्ष सतीश शिकलगार उपस्थित होते.

‘किमान समान कार्यक्रम’

सोमनाथ साळुंखे म्हणाले, ‘‘संसदेत जनतेच्या प्रश्नांवर एकत्रित लढण्याबाबत ॲड. प्रकाश आंबेडकर व विशाल पाटील यांची चर्चा झाली. आमचा किमान समान कार्यक्रम निश्‍चित झाला. राज्यात सर्वाधिक मतांनी विशाल पाटील जिंकतील. लवकरच ॲड. प्रकाश आंबेडकर यांची सांगलीत सभा होणार आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishwas Patil: मराठी साहित्याचा ऱ्हास थांबवा: अध्यक्ष विश्वास पाटील; अन्यथा खूप वाईट दिवस नेमकं काय म्हणाले?

Yearly Numerology 2026: मूलांक 1 आणि 5 साठी 2026 ठरणार शुभ; राहील सूर्याची विशेष कृपा, वाचा अंकज्योतिषनुसार तुमचे वार्षिक राशिभविष्य

आजचे राशिभविष्य - 01 जानेवारी 2026

Morning Breakfast Recipe: नवीन वर्षाची हेल्दी सुरुवात! पहिल्याच दिवशी नाश्त्यात बनवा पौष्टिक पराठा, रेसिपी आहे खूपच सोपी

ढिंग टांग - नवे संकल्प : एक (नुसतेच) चिंतन..!

SCROLL FOR NEXT