Sangli Loksabha Uddhav Thackeray Miraj sabha
Sangli Loksabha Uddhav Thackeray Miraj sabha esakal
लोकसभा २०२४

महाराष्ट्र लुबाडला जाताना दाढीवाले मिंधे दिल्लीची चाकरी करतायत, त्यांचे बूट चाटताहेत; ठाकरेंचा घणाघाती हल्ला

सकाळ डिजिटल टीम

खासदार संजय राऊत म्हणाले, ज्या गुजरातेत औरंगजेब जन्मला, महंमद अली जीना जन्मला त्याच भूमीत हे मोदी-शहा जन्मले आहेत. तोडा अन् फोडा नीतीने औरंगजेबाने राज्य केले. तेच हे करताहेत.

मिरज (जि. सांगली) : ‘‘महाराष्ट्र लुबाडला जात असताना दाढीवाले मिंधे दिल्लीची चाकरी करत आहेत. त्यांचे बूट चाटत आहेत. हीच का शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण?’’ असा घणाघाती हल्लाबोल आज माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी येथील जनसंवाद मेळाव्यात केला.

सांगली मतदारसंघातून त्यांनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांच्या उमेदवारीची घोषणा करत काँग्रेसवर कडी केली. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या समाधीचे दर्शन घेऊन मिरजेत आलेल्या ठाकरेंनी क्रांतीची ही भूमी द्वेषभक्तांना, गद्दारांना गाडून टाकेल, असा विश्वास व्यक्त केला.

ते म्हणाले, ‘‘औरंगजेबाच्या (Aurangzeb) भूमीत जन्मलेल्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. जर कुणी महाराष्ट्र ओरबाडून नेत असेल तर त्या औरंगजेबाच्या वृत्तीला हा महाराष्ट्र मूठमाती दिल्याशिवाय राहणार नाही. मी काल हेच बोललो होतो, त्यावर पंतप्रधान मोदींनी संभ्रमित करायला सुरवात केली. कुणाचा शिरच्छेद करा, असे मी म्हटले नव्हते. पण, त्यांच्या वर्मावर घाव बसला. तुम्ही मला फालतू म्हणता, संपलो म्हणता, मग आमचा पक्ष का फोडला. महाराष्ट्रातील कचरा का गोळा करताय?’’

फडणवीस यांच्यावर टीका करताना ठाकरे म्हणाले, ‘‘दोन पक्षांना फोडून मी पुन्हा आलोय असे सांगणारे फडणवीस निर्लज्जम् सदासुखी आहेत. हा घरफोड्या आहे. दोन घरे फोडून मी बंगला बांधला असे सांगण्यात कसली आलीय मर्दुमकी. हे कसले मर्द, असा सवालही केला. खासदार संजय राऊत म्हणाले, की ज्या गुजरातेत औरंगजेब जन्मला, महंमद अली जीना जन्मला त्याच भूमीत हे मोदी-शहा जन्मले आहेत. तोडा अन् फोडा नीतीने औरंगजेबाने राज्य केले. तेच हे करताहेत. पण, महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जन्मले होते. या मर्दांच्या भूमीने औरंगजेबाला गाडले होते, हा इतिहास विसरू नका. ’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

Nashik Lok Sabha Election 2024: ना पाण्याची सोय, ना उन्हापासून संरक्षण! मतदारांमध्ये तीव्र नाराजी; व्हिलचेअरमुळे दिलासा

SCROLL FOR NEXT