Shashikant Shinde esakal
लोकसभा २०२४

Satara Lok Sabha : 'दुसऱ्यांचे पक्ष फोडून बालेकिल्ला होत नसतो'; शशिकांत शिंदेंचे शिवेंद्रराजेंना जोरदार प्रतिउत्तर

बालेकिल्ला कोणाचा आहे, कोणाचा नाही याला मी महत्त्व देत नाही.

सकाळ डिजिटल टीम

‘‘दुसऱ्यांचे पक्ष फोडून बालेकिल्ला होत नसतो. लोकांच्या हृदयातून पक्ष वाढत असतो. त्यानुसार आजही सातारा राष्ट्रवादीचाच बालेकिल्ला आहे.’’

सातारा : बालेकिल्ला कोणाचा आहे, कोणाचा नाही याला मी महत्त्व देत नाही. लोकांच्या मनात यावेळेस भाजप सरकारच्या विरोधात भावना असून, ती या निवडणुकीत दिसून येईल. बालेकिल्ला होण्यासाठी भाजपला (BJP) दुसऱ्यांचे पक्ष फोडण्याची गरज का लागते. दुसऱ्यांचे पक्ष फोडून बालेकिल्ला होत नसतो. लोकांच्या हृदयातून पक्ष वाढत असतो. त्यानुसार आजही सातारा राष्ट्रवादीचाच (NCP) बालेकिल्ला आहे, असे प्रतिउत्तर आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजेंना दिले.

आमदार शशिकांत शिंदे यांच्या कालच्या शक्तिप्रदर्शनानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी (Shivendraraje Bhosale) टीका करताना सातारा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेला नाही. भाजपची ताकद वाढली आहे, अशी टीका केली होती. त्याला आमदार शिंदे यांनी प्रतिउत्तर दिले.

आमदार शिंदे म्हणाले, ‘‘ज्येष्ठ नेते शरद पवार, यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा जिल्हा आहे. त्यांच्या विचारांची परंपरा जतन करणे हे माझे कर्तव्य आहे. देशात व राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या हुकूमशाहीच्या विरोधात लढताना मतदारराजा माझ्या पाठीशी ठामपणे उभा राहील. जिल्ह्याचा विकासासाठी प्रयत्न करणे व सामान्य लोकांना चांगल्या प्रकारचे प्रतिनिधित्व देणे हे माझे कर्तव्य आहे. कोणाचे आव्हान म्हणून पाहणार नाही. लोकांत भाजपविषयी नाराजी असून, त्यातूनच सातारा लोकसभा मतदारसंघात उठाव होईल. यातूनच शंभर टक्के जनता इतिहास घडवेल.’’

आमदार शिंदे म्हणाले, ‘‘कोणचा बालेकिल्ला आहे कोणाचा नाही. याला मी फारसे महत्त्व देत नाही. लोकांच्या मनामध्ये यावेळेस वेगळी भावना आहे. ती या निवडणुकीत सरकारच्या विरोधात दिसून येईल.’’ बालेकिल्ला होण्यासाठी भाजपला दुसऱ्यांचे पक्ष फोडण्याची गरज का लागते, असा प्रश्न उपस्थित करून ते म्हणाले, ‘‘दुसऱ्यांचे पक्ष फोडून बालेकिल्ला होत नसतो. लोकांच्या हृदयातून पक्ष वाढत असतो. त्यानुसार आजही सातारा राष्ट्रवादीचाच बालेकिल्ला आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fake Cancer Medicines Racket : कॅन्सरच्या बनावट औषधांचे मोठे रॅकेट उघड; ९० हून अधिक रुग्णालयांना पुरवठ्याचा संशय

Maratha Reservation: मराठा आरक्षणावर शिवेंद्रसिंहराजेंचा मोठा दावा; ‘तोंडाला पाने पुसणारे नव्हे, न्यायालयात टिकणारे आरक्षण देणार’

Kundan Sankhe Arrested : पालघर रिलीफ रुग्णालय राडा प्रकरण; निलंबित शिवसेना जिल्हाप्रमुखासह आठ जणांची पोलिसांसमोर शरणागती, राहुल घरतसह 22 जणांना पोलिस कोठडी

Marathi News Live Updates : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी; अमित शाहांसह उद्धव ठाकरे आज बाप्पाचं घेणार दर्शन

लालबागचा राजाचं दर्शन घ्यायचंय? जाणून घ्या पूजा आणि आरतीची वेळ, पाहा LIVE VIDEO

SCROLL FOR NEXT