Satara Lok Sabha esakal
लोकसभा २०२४

Satara Lok Sabha : 'मविआ'च्या उमेदवारीचा कऱ्हाडच राहणार केंद्रबिंदू; कोणाला मिळणार उमेदवारी? उत्सुकता शिगेला

२०१९ मध्ये झालेल्या लोकसभेच्या पेाटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील यांच्या विजयामुळे दहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा प्रतिनिधित्व मिळाले.

सचिन देशमुख

महाआघाडीने आमदार चव्हाण यांना उमेदवारी दिल्यास त्यांच्याविरोधात महायुतीचे उमेदवार म्हणून उदयनराजे भोसले असणार की आणखी कोण? याची उत्सुकता आहे.

कऱ्हाड : लोकसभेसाठी (Satara Lok Sabha) अद्याप महायुती व महाआघाडीचे उमेदवार निश्‍चित झालेले नाहीत. त्यामुळे राजकीय पक्षांसह मतदारांत संभ्रमाचे वातावरण आहे. श्रीनिवास पाटील (Shrinivas Patil) यांच्या रूपाने महाआघाडीचा उमेदवार कऱ्हाडचा असेल, असे चित्र होते. मात्र, श्री. पाटील यांनी उमेदवारीतून माघार घेतल्याने महाआघाडीची उमेदवारी कोणत्या तालुक्याला मिळणार? याची उत्सुकता आहे.

त्यातच राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांची भेट घेतल्याने पुन्हा चर्चेला ऊत आला आहे. या भेटीमुळे महाआघाडीच्या उमेदवारीचा केंद्रबिंदू कऱ्हाडच राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे. लोकसभा मतदारसंघाचे २००९ मधील पुनर्रचनेत कऱ्हाडचा मतदारसंघ गायब झाला. कऱ्हाडचा समावेश सातारा मतदारसंघात झाला. त्यामुळे २००९ ते २०१९ या दहा वर्षांच्या काळात लोकसभेत कऱ्हाडला प्रतिनिधित्वच मिळाले नव्हते.

मात्र, २०१९ मध्ये झालेल्या लोकसभेच्या पेाटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील यांच्या विजयामुळे दहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा प्रतिनिधित्व मिळाले. सातारा लोकसभा मतदारसंघात कऱ्हाड दक्षिण, कऱ्हाड उत्तर व पाटण विधानसभा मतदार संघ निर्णायक ठरणारे आहेत. त्यामुळे कऱ्हाडला विशेष महत्त्व आहे. राजकीय नेत्यांनीही हे महत्त्व जाणले आहे. म्हणूनच सातारा, वाई, कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील प्रतिस्पर्धी उमेदवार असेल तर कऱ्हाडचा उमेदवारच प्रखरपणे लढत देऊ शकेल, असे गणित बनले आहे.

त्यामुळेच खासदार श्रीनिवास पाटील यांच्या माघारीनंतर महाआघाडीने तुल्यबळ लढत देऊ शकणारे उमेदवार म्हणून काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव पुढे आले आहे. त्यामुळे आमदार चव्हाण उमेदवार असल्यास त्यांचे चिन्ह हात असणार की तुतारी? हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र, महायुतीच्या उमेदवारीचा केंद्रबिंदू हा कऱ्हाडच असल्याचे स्पष्ट होत आहे.

...तर रंगतदार लढत

महाआघाडीने आमदार चव्हाण यांना उमेदवारी दिल्यास त्यांच्याविरोधात महायुतीचे उमेदवार म्हणून उदयनराजे भोसले असणार की आणखी कोण? याची उत्सुकता आहे. महायुतीनेही कऱ्हाडमध्येच उमेदवारी दिल्यास निवडणूक रंगतदार होणार, हे निश्‍चित.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke: मोठी बातमी! ३ सेकंदात ४ थप्पड... कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपकेंवर हल्ला; जमावाकडून तरुणाला मारहाण, काय घडलं?

Pune Fraud: वाघोलीत बनावट जिल्हाधिकारी व तहसीलदार आदेश प्रकरण उघड: शेतजमीन नोंदणीसाठी शासनाची फसवणूक

Pune Crime : येरवड्यात आरडाओरड्याचा जाब विचारल्याने तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला, आरोपी शोएब कुरेशी अटकेत

Pune Burglary: सिंहगड रस्त्यावर बंद घरफोडी; २४ लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोकड लंपास

भाजप नगरसेवकांच्या बसचा अपघात, नियंत्रण सुटलं अन् हॉटेलच्या भिंतीला धडकली

SCROLL FOR NEXT