Loksabha Election Sharad Pawar esakal
लोकसभा २०२४

Sharad Pawar: शरद पवारांनी केलं लोकसभेच्या निकालाचं विश्लेषण; म्हणाले, महाराष्ट्र आता...

लोकसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. यामध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडी मोठा विजय मिळवण्याच्या वाटेवर आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : लोकसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. यामध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडी मोठा विजय मिळवण्याच्या वाटेवर आहे. त्याचबरोबर देशातही इंडिया आघाडीनं एनडीएसमोर मोठं आव्हान निर्माण केलं आहे. निकालाचे आकडे समोर येत असल्यानं शरद पवारांनी आता या निकालाचं विश्लेषण केलं आहे. महाराष्ट्र परिवर्तनाच्या वाटेवर आहे, असंही पवार यांनी म्हटलं आहे. (Sharad Pawar analysis on Lok sabha Election result 2024 maharashtra on the way of change)

शरद पवार म्हणाले, हे यश राष्ट्रवादी काँग्रेसचं यश आहे हे आम्ही मानत नाही. आम्ही जी महाविकास आघाडी केली त्या आघाडीच्यावतीनं, विशेषतः काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेच्या नेत्ववाखालील शिवसेना यांनी जीवाभावानं काम करण्याची भूमिका घेतली. त्यामुळं हे यश आम्हाला तिन्ही पक्षांना मिळालं आहे.

महाराष्ट्रात सध्या परिवर्तनाचं वातावरण आहे. आम्ही तिघेही एकत्र राहून पुढच्या काळात आमची धोरणं ठरवू आणि महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेची काळजी घेऊ. उद्याची बैठक ही दिल्लीत असेल त्या बैठकीत मी हजेरी लावणार आहे. मी चंद्रबाबूंशी बोललो नाही आणि इतर कोणाशीही बोललेलो नाही. मी केवळ काँग्रेसशी बोललो आहे. यासंदर्भात आमच्या सहकारी पक्षांशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, असंही यावेळी शरद पवारांनी स्पष्ट केलं.

महाविकास आघाडीच्यावतीनं आम्ही सामुहिक कष्ट करुन लोकांमध्ये जाऊन त्यानंतर उद्याचं विधानसभेचं चित्र बदलण्यासाठी आमचे प्रयत्न सुरुच आहेत. पण हा लोकसभेचा निकाल आमच्यासाठी अधिक प्रेरणादायी आहे. त्यामुळं आम्हाला चांगलं यश मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video Viral: हा कसला 'देवदास'; तो तर रोज 'पारो' बदलतो! आशिष नेहराचे On Air हार्दिक पांड्याबद्दल वादग्रस्त विधान

Karjat ZP Election Result : कर्जतमध्ये आमदार थोरवे यांच्या सुनबाई पराभूत; संपूर्ण निकाल समोर

Pune News : ‘लाडक्या बहिणीं’वर खैरात, मात्र ‘लाडक्या भावां’च्या ताटात खडखडाट! निर्वाह भत्ता मिळत नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय

कसा झालेला विनोद खन्ना यांचा मृत्यू? दुसऱ्या पत्नीने अनेक वर्षांनंतर मौन सोडलं; म्हणाल्या, 'शेवटच्या दिवसात तर...'

Zilla Parishad Panchayat Samiti Election result Live Update: मावळमध्ये भाजपला मोठा धक्का; १५ पैकी एकही जागा जिंकता आली नाही

SCROLL FOR NEXT