Hatkanangale Lok Sabha Jayant Patil esakal
लोकसभा २०२४

Jayant Patil : सत्यजित पाटलांची 'मशाल' जयंत पाटलांच्या हाती! हातकणंगलेत राष्ट्रवादीची जबाबदारी वाढली!

सत्यजित पाटील यांचे शिवधनुष्य या मतदारसंघात जयंत पाटील यांना उचलावे लागणार आहे.

शांताराम पाटील

सरुडकरांना इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात प्रत्येक मतदार हा नवीन असणार आहे. त्यामुळे जयंत पाटील यांच्यावर सरुडकरांची जबाबदारी असेल.

इस्लामपूर : हातकणंगले लोकसभा (Hatkanangale Lok Sabha) मतदारसंघात सत्यजित पाटील-सरुडकर यांची महाविकास आघाडीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारी घोषित झाल्याने जयंत पाटील यांची जबाबदारी वाढली आहे.

राजू शेट्टी (Raju Shetti) महाविकास आघाडीत न आल्यास आम्हाला दुसरा उमेदवार देण्याशिवाय पर्याय नाही, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील (Jayant Patil) यांनी या पूर्वी माध्यमांना दिली होती. त्यामुळे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाशी अत्यंत अल्पपरिचय असलेले सत्यजित पाटील यांची पर्यायाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मदारही जयंत पाटलांच्या खांद्यावर असणार आहे.

हातकणंगले मतदारसंघात सत्यजित पाटील - सरुडकर (Satyajit Patil - Sarudkar) यांच्या उमेदवारीने प्रथमच शाहूवाडी या डोंगराळ मतदारसंघातील उमेदवाराला लोकसभेची निवडणूक लढायची संधी मिळाली आहे. या पूर्वी या मतदारसंघात शाहूवाडीतून कोणताही उमेदवार निवडणूक लढलेला नाही. त्यामुळे शाहूवाडीच्या उमेदवाराचा कसल्याही प्रकारचा इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाशी संपर्क नाही. राजू शेट्टी यांचा वाळवा-शिराळा मतदारसंघात पूर्वीपासून चळवळीच्या माध्यमातून संपर्क आहे. तर निवेदिता माने व धैर्यशील माने या मायलेकरांनी या मतदारसंघात चौथ्यांदा निवडणुकीसाठी सामोरे जात आहेत. त्यांचाही या मतदारसंघात बऱ्यापैकी संपर्क आहे.

सत्यजित पाटील - सरुडकर हे या लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गट, काॅंग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या राजकीय पक्षांच्या महायुतीकडून उमेदवारी करीत आहेत. महायुतीने ही जागा घेताना हातकणंगले, शिरोळ, शाहूवाडी व इस्लामपूर या मतदारसंघात चाचपणी करून विजयाची गणिते मांडत उमेदवार दिला आहे. हातकणंगलेतील इस्लामपूर व शिराळा हे दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रभावाखाली येतात. या ठिकाणी काॅंग्रेसचीही बऱ्यापैकी ताकद आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाची ताकद अत्यल्प आहे.

त्यामुळे सत्यजित पाटील यांचे शिवधनुष्य या मतदारसंघात जयंत पाटील यांना उचलावे लागणार आहे. या बरोबरच या शिराळा व वाळवा मतदारसंघात राजू शेट्टी व धैर्यशील माने यांनी येथील काही राजकीय नेत्यांशी वैयक्तिक संबंध निर्माण करीत आपले गट तयार केले आहेत. सरुडकरांना मात्र इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात प्रत्येक मतदार हा नवीन असणार आहे. त्यामुळे जयंत पाटील यांच्यावर सरुडकरांची जबाबदारी असेल. जयंत पाटील यांना आता या निवडणुकीत आपली सर्व ताकद पणाला लावण्याशिवाय पर्याय उरणार नाही.

इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात...

  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे - मर्यादित ताकद

  • सर्व धुरा जयंत पाटील यांच्या खांद्यावर

  • सत्यजित पाटील - सरुडकर नवखे उमेदवार

  • चळवळीच्या माध्यमातून राजू शेट्टी यांचा संपर्क घराघरांत

  • या पूर्वी निवेदिता माने व आता धैर्यशील माने यांनी हातकणंगलेत निवडणूक लढल्याने त्यांचाही स्वतंत्र गट.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT