Sharad Pawar Satara Madha esakal
लोकसभा २०२४

Sharad Pawar : फलटण की अकलूज? माढ्याच्या उमेदवारीबाबत पवारांचे संकेत; संजीवराजे-धैर्यशील तुतारी हाती घेणार?

सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघावरून (Madha Lok Sabha Constituency) सध्या राजकीय खल सुरू आहे.

सकाळ डिजिटल टीम

फलटणमधून संजीवराजे नाईक-निंबाळकर (Sanjivraje Naik-Nimbalkar) की अकलूजचे धैर्यशील मोहिते-पाटील (Dhairyasheel Mohite-Patil) यापैकी कोण उमेदवार? हे चर्चेतून स्पष्ट होणार आहे.

पुणे/सातारा : सातारा आणि माढ्याचे उमेदवार लवकर जाहीर होतील, असे सांगून अकलूज की फलटण यापैकी कोणी लढायचे, हे त्यांनी ठरवायचे आहे, असे सूचक विधान खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले. दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) तुतारीच्या चिन्हावर लढण्यास तयार असतील, तर त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघावरून (Madha Lok Sabha Constituency) सध्या राजकीय खल सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून साताऱ्यात व माढ्यात कोणाला उमेदवारी मिळणार? याची उत्सुकता आहे. या पार्श्वभूमीवर खासदार शरद पवार यांनी पुणे येथे पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना काही संकेत दिले आहेत. भाजपकडून माढा लोकसभेचा (Madha Lok Sabha) उमेदवार जाहीर झालेला आहे.

आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून कोण उमेदवार? याची उत्सुकता आहे. आज पत्रकारांशी गप्पा मारताना शरद पवारांनी माढ्याचा तिढा सुटला असून, अकलूज की फलटण हे स्थानिक पातळीवर बसून त्यांनी निर्णय करायचा आहे, असे सांगून निर्णय निंबाळकर व मोहिते पाटील यांच्या कोर्टात टाकला आहे. त्यामुळे फलटणमधून संजीवराजे नाईक-निंबाळकर (Sanjivraje Naik-Nimbalkar) की अकलूजचे धैर्यशील मोहिते-पाटील (Dhairyasheel Mohite-Patil) यापैकी कोण उमेदवार? हे चर्चेतून स्पष्ट होणार आहे.

यामध्ये माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांची भूमिका महत्त्वपूर्ण असणार आहे. आता हे दोन्हीकडील नेतेमंडळी एकत्र बसून कोणा एकाच्या नावावर शिक्कामोर्तब करतील; पण संजीवराजे नाईक-निंबाळकर हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असून, त्यांना पक्ष व पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. माढ्यातून उमेदवारीसाठी अजित पवारांची साथ सोडून ते तुतारी हाती घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे, तर माढा लोकसभा मतदारसंघात सोलापूरच्या भागात धैर्यशील मोहिते-पाटील यांना तुतारीची उमेदवारी जाहीर झाल्याची चर्चा रंगली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : जुगाराचे उलटे दान

Chh. Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरात गणेश मंडळाच्या मंडप उभारणीच्या वादातून तुफान हाणामारी; तिघा भावांकडून हल्ला, एकाचा मृत्यू

आजचे राशिभविष्य - 23 ऑगस्ट 2025

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २३ ऑगस्ट २०२५ ते २९ ऑगस्ट २०२५ - मराठी राशी भविष्य

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 23 ऑगस्ट 2025

SCROLL FOR NEXT