Sharad Pawar esakal
लोकसभा २०२४

Sharad Pawar: वंचितने आमच्यासोबत यावं, साताऱ्यात उमेदवार बदलणार; शरद पवारांनी स्पष्ट सांगितलं 

Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीत कोणतीही नाराजी नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच वंचित आणि सातारा लोकसभेच्या जागेवर त्यांनी भाष्य केले आहे.

Sandip Kapde

Sharad Pawar: लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची लगबग सुरु आहे. भाजप, शिवसेना आणि उद्धव ठाकरे गटाने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. काँग्रेसने देखील  सात उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र शरद पवार गटाने अद्याप उमेदवार उभे केले नाहीत. महाविकास आघाडीत अजूनही उमेदवारीवरुन चर्चा सुरु आहे. आज शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली.

वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीसोबत यावं, म्हणून प्रयत्न सुरु आहेत. लोकसभेसाठी महाविकास आघाडीच किमान समान कार्यक्रमाबाबत चर्चा सुरु आहे. सातारा राष्ट्रवादीचीच जागा, तिथे राष्ट्रवादीचाच उमेदवार येईल. काल झालेल्या बैठकीत कोणतीही नाराजी नव्हती, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.

वंचित बहुजन आघाडी (VBA) चे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी (27 मार्च) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी  उमेदवारांची नावे जाहीर केली आणि त्यांचा पक्ष विरोधी महाविकास आघाडी (MVA) सोबत युती करणार नसल्याचे संकेत दिले.

पत्रकार परिषदेला संबोधित करताना आंबेडकर यांनी आरोप केला की MVA घटक काँग्रेस, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) आणि शिवसेना (UBT) घराणेशाही राजकारणाचा प्रचार करण्यासाठी त्यांच्या पक्षाचा वापर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या प्रयत्नाला यश येईल का?, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी त्यांच्या पक्षाच्या आठ उमेदवारांची नावे जाहीर केली तर त्यांनी स्वत:ची अकोल्यातून उमेदवारी जाहीर केली. यापैकी बहुतांश जागांसाठी काँग्रेस आणि शिवसेनेने  (UBT)  उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी आणि वंचित अशी लढाई कायम राहीली तर भाजपच्या उमेदवाराला फायदा होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.  

सातारा लोकसभेच्या जागेवर श्रीनिवास पाटील यांनी तब्येतीच्या कतारणास्तव निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे दोन ते तिन दिवसात साताऱ्यावर उमेदवार घोषित करु, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. साताऱ्यात बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, सुनील माने यांचं नाव चर्चेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRA vs JPN World Cup 2026: व्हॉट अ मॅच... ब्राझीलने शेवटच्या मिनिटाला मिळवला थरारक विजय, जपानच्या लढाऊवृत्तीचे जगभरात कौतुक

NCP finance portfolio: अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर जय पवारांचा दावा

Raigad Journalists Protest: पत्रकारांना जिवे मारण्याच्या धमकीप्रकरणी रायगड पत्रकार संतप्त; खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी

Aashadhi Wari Restrictions: आषाढी वारीत ४ ते ९ जुलैदरम्यान आळंदीत विवाह, साखरपुडा बंद; पोलिसांकडून धर्मशाळा व मंगल कार्यालयांना स्पष्ट सूचना

Pune Water Crisis : मान्सून लांबल्याने पुण्यावर पाणीटंचाईचे संकट, धरण क्षेत्रात कृत्रिम पावसाचा महापालिकेचा प्रयोग चर्चेत

SCROLL FOR NEXT