Sharad Pawar sakal
लोकसभा २०२४

Sharad Pawar : लोकशाही टिकविण्यासाठी लढा; मोदींना महाराष्ट्रात विजयाची खात्री नाही

‘जगात सर्वात प्रबळ असणारी लोकशाही टिकेल की नाही, अशी शंका आता जगभरातील देशांना येऊ लागली आहे. आपल्याकडे अनेक महिन्यांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही घेतलेल्या नाहीत.

सकाळ वृत्तसेवा

श्रीगोंदे (जि. अहमदनगर) : ‘‘जगात सर्वात प्रबळ असणारी लोकशाही टिकेल की नाही, अशी शंका आता जगभरातील देशांना येऊ लागली आहे. आपल्याकडे अनेक महिन्यांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही घेतलेल्या नाहीत.

काही दिवसांनी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांबाबतही हेच चित्र दिसेल. आता लोकशाही टिकविण्यासाठी लढा,’’ असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारासाठी बुधवारी शहरात झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात होते. पवार म्हणाले, ‘‘महाराष्ट्रातील परिस्थितीची खात्री नसल्याने पुन्हा पुन्हा सभा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यात तब्बल पाच टप्पे पाडून निवडणुकीचे वेळापत्रकच बदलले.

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असणाऱ्या भारतातील लोकशाहीबाबत जागतिक पातळीवर चिंता व्यक्त होत आहे. त्यामुळे ही लोकशाही वाचविण्यासाठी वाटेल ती किंमत मोजून परिवर्तन घडवून आणावे लागणार आहे.’’ नीलेश लंके यांना संधी द्या, असे आवाहन त्यांनी केले.

माझी चिंता करणाऱ्यांपासून जनता मुक्त होईल

‘‘पंतप्रधान मोदी यांना माझे आणि उद्धव ठाकरेंचे नाव घेतल्याशिवाय चैन पडत नाही. एका सभेत त्यांनी माझा उल्लेख ‘अतृप्त आत्मा’ असा केला आहे. हा आत्मा माझी चिंता करणाऱ्यांपासून महाराष्ट्रातील जनतेला मुक्त करेल,’’ असा टोला पवार यांनी लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT