Sharad Pawar sakal
लोकसभा २०२४

Sharad Pawar : मोदी यांचे वक्तव्य देशाच्या ऐक्याविरोधात - पवार ; पंतप्रधान पदावरील व्यक्ती असे बोलूच कशी शकते?

‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमध्ये मंगळसूत्राबाबत केलेले वक्तव्य देशाच्या ऐक्‍याच्या विरोधात आहे. पंतप्रधानपदावरील व्यक्ती असे बोलूच कशी शकते, असा प्रश्‍न मला पडला आहे. म्हणूनच आता मोदींना विरोध करण्याची वेळ आली आहे,’’

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमध्ये मंगळसूत्राबाबत केलेले वक्तव्य देशाच्या ऐक्‍याच्या विरोधात आहे. पंतप्रधानपदावरील व्यक्ती असे बोलूच कशी शकते, असा प्रश्‍न मला पडला आहे. म्हणूनच आता मोदींना विरोध करण्याची वेळ आली आहे,’’ असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी केले.

पवार म्हणाले, ‘‘मी कृषिमंत्री असताना तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या गंभीर समस्या दाखविण्यासाठी अमरावतीला आणले होते. त्यांना तेथील शेतकऱ्यांचे प्रश्न व अडचणी प्रत्यक्षात दाखविल्या. त्यानंतर कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला. गेल्या दहा वर्षांत अमरावती, यवतमाळ व इतर जिल्ह्यांतील शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. काँग्रेसच्या काळापेक्षा आता दीडपट आत्महत्या होत आहेत.’’

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करत पवार म्हणाले, ‘‘मोदी सरकारच्या दहा वर्षांच्या काळात शेतीसंबंधीचे प्रश्‍न मोठ्या प्रमाणात वाढले. २०१४पासून आतापर्यंत शहांच्या पक्षाकडे देशाची सत्ता आहे. शहांनी माझ्या कृषिमंत्री पदाच्या कार्यकाळावर टीका करण्यापेक्षा महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी व त्यांच्या पक्षाने काय केले हे जनतेला सांगावे.’’

‘संरक्षणाबद्दल गृहमंत्र्यांचे आभार’

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांना ‘वाय प्लस’ पोलिस सुरक्षा दिली आहे. त्याबाबत विचारलेल्या प्रश्‍नावर ‘‘मुलांबद्दल आपण बोलणार नाही,’’ असे सांगत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ‘‘आमच्या कुटुंबातील मुलाला संरक्षण दिले, यासाठी गृहमंत्र्यांचे आभार,’’ असा टोला लगावला. एकनाथ खडसे आता आमचे नाहीत, ते भाजपमध्ये कधी प्रवेश करतील, याचे नियोजन भाजपने केले असेल, अशा शब्दांत खडसे यांच्याविषयी त्यांनी प्रतिक्रिया दिली. छगन भुजबळांच्या प्रश्नावर पाटील म्हणाले, ‘‘जुने सहकारी म्हणून भुजबळांच्याविषयी सहानुभूती आहे. त्यांची तिकडे प्रचंड अवहेलना होत आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT