Satara Loksabha Constituency sakal
लोकसभा २०२४

Satara Loksabha Constituency : साताऱ्यातून ‘मविआ’तर्फे शशिकांत शिंदे? ; रावेर, माढा मतदारसंघाचा निर्णय अद्याप प्रलंबित

सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शशिकांत शिंदे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. उमेदवारी गृहीत धरून शिंदे यांनी बैठकांचा धडाका सुरू केला आहे. साताऱ्यापाठोपाठ रावेर आणि माढाच्या उमेदवारीकडे लक्ष लागले आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शशिकांत शिंदे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. उमेदवारी गृहीत धरून शिंदे यांनी बैठकांचा धडाका सुरू केला आहे. साताऱ्यापाठोपाठ रावेर आणि माढाच्या उमेदवारीकडे लक्ष लागले आहे.

सातारा लोकसभा जागेवर प्रकृतीच्या कारणास्तव विद्यमान खा. श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढण्यास असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे या जागेवरून उमेदवारीचा पेच निर्माण झाला होता. ही जागा काँग्रेस पक्षाला सोडून, तेथून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी देण्याबाबतही चर्चा झालेली होती.

मात्र सातारची जागा शरद पवार गटानेच लढावी, असे पक्षातील नेत्यांनी एकमताने सांगितल्याने शिंदे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले आहे. लवकरच त्यांच्या उमेदवारीची घोषणा होईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. रावेर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र भैय्या पाटील तसेच श्रीराम पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. माढामधून धैर्यशील मोहिते पाटील, अनिकेत देशमुख यापैकी कोणाला उमेदवारी मिळणार, याकडे लक्ष आहे.

रावेरमध्ये पोकळी जाणवणार

साताऱ्याचा तिढा सुटला असला तरी माढा आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा कायम आहे. या मतदारसंघात एकनाथ खडसे यांच्यावर शरद पवार गटाची मदार होती. मात्र ते पुन्हा भाजपत परतत असल्याने पक्षाला नेतृत्वाची पोकळी जाणवेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 2nd T20I Live: अभिषेक शर्माचा विश्वविक्रम! अनोखे 'शतक' अन् मोडला रोहित शर्माच्या नावावर असलेला विक्रम

Digital Arrest Scam:‘दोन तासांत दिल्लीला या’; पोलिसांच्या नावाने धमकावून ४३ लाख उकळले

Latest Marathi News Live Update : ‘मुलांकडे माहिती आहे, पण ज्ञान नाही; शिक्षकांची जबाबदारी मोठी’ – देवेंद्र फडणवीस

Alephata Garbage: आळेफाटा बायपासवर कचऱ्याचे ढीग; दुर्गंधीने नागरिक आणि वाहनचालक त्रस्त

IND vs NZ 2nd T20: भारतीय गोलंदाजांचा सुरुवातीला कहर, मग फिलिप्स-जॅकोब्सचा पलटवार! न्यूझीलंडने डाव सावरला, अखेर काय घडलं?

SCROLL FOR NEXT