Loksabha Election 2024 sakal
लोकसभा २०२४

Loksabha Election 2024 : शिरूरला आढळराव पाटील राष्ट्रवादीचे उमेदवार ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

‘‘तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार येणार, ही वस्तुस्थिती आहे. राज्यात व केंद्रात एका विचाराचे सरकार आले तर विकासकामांना निधी कमी पडत नाही. त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघातून मोदी यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनाच मोठ्या मताधिक्याने निवडून द्या.

सकाळ वृत्तसेवा

मंचर : ‘‘तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार येणार, ही वस्तुस्थिती आहे. राज्यात व केंद्रात एका विचाराचे सरकार आले तर विकासकामांना निधी कमी पडत नाही. त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघातून मोदी यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनाच मोठ्या मताधिक्याने निवडून द्या. या परिसराच्या विकासाला गती देण्याची जबाबदारी माझी राहील,’’ अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

मंचर (ता. आंबेगाव) येथे आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना उमेदवारी देण्याची घोषणा पवार यांनी केली. उपस्थितांनी जोरदार टाळ्या व घोषणा देऊन उमेदवारीचे स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, आमदार दिलीप मोहिते पाटील, आमदार अतुल बेनके, प्रदीप गारटकर, पोपटराव गावडे, देवेंद्र शहा, किरण वळसे पाटील, कल्पना आढळराव पाटील, विष्णू हिंगे, बाळासाहेब बेंडे, विवेक वळसे पाटील, प्रदीप वळसे पाटील व पांडुरंग पवार उपस्थित होते. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.

अजित पवार म्हणाले, ‘‘खेड, आंबेगाव जुन्नर तालुक्यातील कोल्हापूर पद्धतीतील बंधाऱ्यांचे पाणी आरक्षण आम्ही ठेवणार आहोत. कळमोडीचा पाणी प्रश्न वळसे पाटील व मोहिते पाटील एकत्र बसून सोडवणार आहेत. आढळराव पाटील हे आंबेगाव तालुक्याचे उमेदवार आहेत. त्यामुळे दिलीपराव व शिवाजीराव यांच्याबरोबर भाजप, रासप, कवाडे गट व सदाभाऊ खोत हे सर्वजण आहे. जोरदारपणे काम करून आंबेगावमधून एक लाखाचे मताधिक्य मिळेल, अशा पद्धतीने नियोजन करा.’’

‘सभा अमोल नाही अनमोल’

खासदार अमोल कोल्हे यांच्या कार्यपद्धतीवर अजित पवार यांनी टीका केली. ते म्हणाले, ‘‘शिवाजीराव यांची राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश सभा अमोल नाही अनमोल आहे. डायलॉगबाजी करणे चित्रपटात व नाटकात काम करणे व जनतेसमोर काम करताना घाम गाळणे, यामध्ये फार मोठा फरक आहे. तुम्हाला जनतेसाठी वेळ नाही, तर मग तुम्ही परत का उभे राहिले. नथुराम गोडसे यांची भूमिका तुम्ही केली होती. आता बघूया काँग्रेसवाले तुमचा प्रचार करणार का? भावनिक होऊ नका, आपल्या मदतीसाठी धावून येणारे आढळराव पाटील यांना साथ द्या.’’

सध्या विरोधकांकडे कुठलाही मुद्दा नाही. संविधान बदलणार, यापुढे निवडणुका होणार नाही. असा सुरू असलेला प्रचार पूर्णपणे खोटा आहे. शाहू, फुले आंबेडकर यांचा विचार आम्ही कधी सोडलेला नाही व सोडणार नाही. सर्व जाती-धर्माच्या लोकांना बरोबर घेण्याचं काम राज्यात महायुतीचे सरकार करत आहे.

- अजित पवार, उपमुख्यमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT