Jyoti Mete
Jyoti Mete 
लोकसभा २०२४

Shiv Sangram: 'शिवसंग्राम' विधानसभेच्या 12 जागा लढवणार, लोकसभेची रणनीती काय? ज्योती मेटेंनी स्पष्ट केली भूमिका

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुणे : शिवसंग्राम संघटनेची आज पुण्यात बैठक पार पडली. या बैठकीनंतर ज्योती मेटे लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. यावेळी प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे हे देखील उपस्थित होते. (Shiv Sangram will contest 12 assembly seats and Neutral for Lok Sabha Jyoti Mete explained role of her party)

लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर आम्ही पुन्हा राज्यकार्यकारिणीची बैठक घेऊ. यानंतर विधानसभेची तयारी केली जाईल. शिवसंग्राम विधानसभेच्या १२ जागा लढवणार आहे, हे आम्ही गेल्याच बैठकीत जाहीर केलं आहे. विधानसभेच्या दृष्टीनं जी काही रणनीती आखावी लागेल यासाठी ज्या पक्षांची मदत घ्यावी लागेल किंवा ज्यांच्यासोबत युती करावी लागेल याचाही विचार करु. लोकसभेसाठी आम्ही तटस्थतेची भूमिका घेतली आहे, अशी माहिती यावेळी प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांनी दिली. (Latest Marathi News)

राजकारणात अनुषंगिक भूमिका असतात त्यामुळं नाराजीचा प्रश्नच उपस्थित होत नाही. योग्यवेळी योग्य निर्णय घेणं यालाच राजकारणात महत्व असतं. आमचीही भूमिका अशीच होती, असं यावेळी ज्योती मेटे यांनी सांगितलं. दरम्यान, लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत बीडच्या जनतेची अशी इच्छा होती त्यामुळं आमच्या संघटना पातळीवर हा विचार झाला होता. (Marathi Tajya Batmya)

जनतेचा सन्मान करण्याच्या अनुषंगानं मी बीडमध्ये लोकसभा निवडणूक लढवणार नाही अशी भूमिका जाहीर केली होती. कारण यासाठी आम्ही विधानसभेची चाचपणी केली होती, त्यामुळं जनतेच्या हिताचा आदर करण्यासाठी आम्ही विधानसभेबाबत निर्णय घेतला आणि लोकसभेतून माघार घेतली, असंही ज्योती मेटे यांनी यावेळी स्पष्ट केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election : प्रचाराचे वादळ थंडावले ; सातव्या टप्प्यासाठी उद्या मतदान

Kalyani Nagar Accident :भ्रष्ट चेल्यांनी बदलले तिघांचे रक्तनमुने ; ‘ससून’मधील डॉक्टरांची बनवाबनवी

Pune Accident : पुण्यात पुन्हा रॅश ड्रायव्हिंग ; बीआरटी मार्गात घुसवली मोटार

World No Tobacco Day 2024 : हृदय-फुफ्फुसांपासून ते कर्करोगापर्यंत, धूम्रपानामुळे ‘या’ गंभीर आजारांना मिळतेय आमंत्रण

World No Tobacco Day 2024: ‘तंबाखू’वर मात शक्य! हवा फक्त दृढनिश्चय; ‘आरोग्य’ विभागाकडून 2 वर्षात दीड लाखावर समुपदेशन

SCROLL FOR NEXT