Eknath Shinde 
लोकसभा २०२४

ShivSena: शिवसेनेचे दोन उमेदवार बदलणार?; संजय शिरसाटांचे सुतोवाच

यामध्ये एक पश्चिम महाराष्ट्रातून तर दुसरा उमेदवार मराठवाड्यातून बदलला जाऊ शकतो.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : महायुतीत शिवसेनेनं घोषित केलेल्या आठ उमेदवारांपैकी दोन उमेदवार बदलले जाऊ शकतात, असे सुतोवाच आमदार संजय शिरसाट यांनी केलं आहे. यामध्ये एक पश्चिम महाराष्ट्रातून तर दुसरा उमेदवार मराठवाड्यातून बदलला जाऊ शकतो. (shivsena eknath shinde may change loksabha candidates on hingoli and hatkangale constituency)

कोणते उमेदवार बदलणार?

मराठवाड्यात हिंगोली आणि पश्चिम महाराष्ट्रात हातकणंगले या दोन जागांवरील उमेदवार बदलण्याची सध्या चर्चा सुरु आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघातून हेमंत पाटील आणि हातकणंगले इथून धैर्यशील माने हे उमेदवार जाहीर झाले आहेत. या दोघांना स्थानिक पातळीवरुन विरोध होत आहे. त्यामुळं यावर शिक्कामोर्तब झालं आहे. (Marathi Tajya Batmya)

उमेदवार बलण्याची चर्चा का?

स्थानिक पातळीवर या उमेदवारांविरोधात जनमत असल्याचं भाजपच्या काही सर्व्हेंमधून समोर आलं आहे. त्यामुळं भाजपनं हे उमेदवार बदलण्याबात शिवसेनेवर मोठा दबाव टाकल्याचं बोलल जात आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी उमेदवार बदलण्याची मागणी केली आहे. (Latest Marathi News)

संजय शिरसाट काय म्हणाले?

जर एखाद्या ठिकाणी उमेदवार कमजोर वाटत असेल तर तो बदलण्याचा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आहे. महाराष्ट्रात शक्यता नाकारता येत नाहीत. मराठवाड्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील जागा बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT