Gajanan Kirtikar sakal
लोकसभा २०२४

Gajanan Kirtikar : ''मुलगा उबाठा गटाकडून रिंगणात असला तरी त्याच्याविरोधात प्रचार करणार'', गजानन कीर्तिकर नेमकं काय म्हणाले?

संतोष कानडे

मुंबईः ठाकरे गटामधून शिवसेनेत दाखल झालेले ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांनी मुलाविरोधात प्रचार करणार असल्याचं जाहीर केलं आहे. आपण स्वतः निवडणूक लढवणार नसलो तरी महायुतीकडून जो उमेदवार दिला जाईल, त्याचा प्रचार करणार असल्याचं ते म्हणाले. मुलगा अमोल कीर्तिकर यांना ठाकरे गटाने उमेदवारी जाहीर केलेली आहे.

सोमवारी माध्यमांशी बोलताना गजानन कीर्तिकर म्हणाले की, मी युतीधर्म मी आणि राजधर्म पाळणार आहे. जरी माझा मुलगा उबाठा गटाकडून निवडणूक लढणार असला तरी त्याच्या विरोधात प्रचार करून मी माझी पार्टी जो उमेदवार देईल त्याचं काम करणार आहे.

'एनडीए'चा आकडा चारशेच्या पार करण्यासाठी एक-एक मतदारसंघ पिंजून काढू, माझ्या मतदारसंघातसुद्धा मी प्रचार करेन.. मी निवडणूक लढलो नाही तरी मी दहा वर्षे काम केले असून माझा अनुभव आहे. माझा उमेदवार जिंकून त्याला खासदार बनवण्यात मला समाधान मिळेल, असं कीर्तिकर म्हणाले.

''मी निवडणूक लढणार नाही, मी मुलाविरोधात निवडणूक लढणार नाही, त्याला हरवणार नाही तर माझ्या पक्षाचा उमेदवार जो असेल त्याला जिंकून आणणार आहे.'' अतं गजानन कीर्तिकर यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, सोमवारी दिंडोशी विधानसभा मतदारसंघात गजानन कीर्तिकर यांच्या उपस्थितीत मेळावा पार पडला. भाजपा आमदार राजहंस सिंह यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते. या वेळी महायुतीच्या सर्व घटकपक्षांचे पदाधिकारी उपस्थितीत होते. यावेळी आमदार आशिष शेलार यांनी आपल्या भाषणात काँग्रेसच्या न्यायपत्राचा खरपूस समाचार घेतला.

''संविधानावर चर्चा करण्यासाठी या''

संविधानावर चर्चा करण्यासाठी जितेंद्र आव्हाड, नाना पटोले आणि काँग्रेसवाल्यांनी यावे आम्ही तयार आहोत. जागा, तारीख, वेळ तुमची असं थेट आव्हानही यावेळी आमदार आशिष शेलार यांनी केले. महामानव भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला दिलेली घटना बदलणार, असा अपप्रचार आज विरोधक करीत आहेत. ते हे का विसरत आहेत की, हेच ते काँग्रेसवाले आहेत त्‍यांनी घटनाकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना निवडणुकीत पराभूत केले होते.

ते पुढे म्हणाले की, काँग्रेसचा जाहीरनामा म्‍हणजे खोटारडेपणाचा कळस म्‍हणावा असाचा आहे. त्‍यांनी जाहीरनाम्‍याचे नाव न्‍यायपत्र असे ठेवले आहे. त्‍यांनी या झुठपत्रात संविधानाचे संरक्षण करण्‍याची बाब नमूद केली आहे. मग आणीबाणीमध्ये या देशाला कुणी ढकलले, हे आज युवा वर्गाला न्‍याय देण्‍याची गोष्ट करीत आहेत, मग जेएनयुमध्‍ये तरुणांची माथी कुणी भडकवली, हे आज शिक्षणाला न्‍याय देण्‍याची घोषणा करीत आहेत मग नवे शैक्षणिक धोरण कुणी रोखले, आज हे भ्रष्‍टाचार कमी करणार असे सांगत आहेत.. काँग्रेसच्या घोटाळ्यांची यादीच वाचून दाखवत आमदार आशिष शेलार यांनी खरपूस समाचार घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT