Maval Loksabha Constituency
Maval Loksabha Constituency sakal
लोकसभा २०२४

Maval Loksabha Constituency : श्रीरंग बारणे यांचे शक्तिप्रदर्शन ; मावळसाठी महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्चशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करत मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी सोमवारी (ता. २२) उमेदवारी अर्ज दाखल केला. आकुर्डीतील खंडोबा माळ येथून त्यांनी प्रचारार्थ पदयात्रा काढली. त्यात पिंपरी-चिंचवडसह मावळ तालुका व घाटाखालील उरण, कर्जत, पनवेल भागातून आलेले कार्यकर्ते सहभागी झाले होते. बारणे यांच्यासह मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री पवार प्रचार रथात होते.

निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्याकडे बारणे यांनी अर्ज सादर केला. त्यापूर्वी आकुर्डीतील खंडोबा माळ येथून बारणे यांच्या पदयात्रेला प्रारंभ झाला. त्यात शिंदे, पवार, पाटील यांच्यासह शिक्षणमंत्री दीपक केसरकर, विधान परिषदेतील भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री बाळा भेगडे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, अमर साबळे, आमदार प्रशांत ठाकूर, अण्णा बनसोडे, सुनील शेळके, अश्विनी जगताप, उमा खापरे, महेश बालदी, भाजपचे क्लस्टर प्रमुख बाळासाहेब पाटील, रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे, मनसेचे सचिन चिखले आदींसह भाजपसह शिवसेना, राष्ट्रवादी कॉँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

खंडोबा माळ येथे श्री खंडेरायाचे दर्शन घेऊन मिरवणुकीस प्रारंभ झाला. ढोल ताशांचा दणदणाट, भगव्या टोप्या, फेटे, भगवे झेंडे, धनुष्यबाण चिन्ह, महायुतीतील पक्षांचे झेंडे घेऊन, कार्यकर्ते सहभागी झाले होते. उमेदवारी अर्ज दाखल करायला निघण्यापूर्वी थेरगाव येथील निवासस्थानी श्रीरंग बारणे यांना पत्नी सरिता, बहिण रुक्मिणी कस्पटे, अश्विनी जाधव, सुना स्नेहा बारणे, नीता बारणे, कावेरी बारणे यांनी औक्षण करून विजयासाठी शुभेच्छा दिल्या. बारणे यांचे पुत्र प्रताप, विश्वजीत व परिवारातील सदस्य उपस्थित होते.

२०१९ मधील आपलाच मताधिक्याचा विक्रम मोडून निवडून येऊ. मावळ लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत. मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत, अशी देशातील नागरिकांची भावना आहे. त्यामुळे विक्रमी मताधिक्याने आपण विजयी होऊ.

- श्रीरंग बारणे, उमेदवार

  • आकुर्डीत माजी नगरसेवक प्रमोद कुटे यांनी क्रेनच्या साह्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व बारणे यांना पुष्पहार घालून वाहनावर पुष्पवृष्टी.

  • प्राधिकरणग्रस्त शेतकऱ्यांना साडेबारा टक्के परतावा दिल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांचा आकुर्डी ग्रामस्थांकडून सत्कार.

  • धनुष्यबाण चिन्हाची प्रतिकृती हाताने उंचावत मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा

  • उपमुख्यमंत्री अजित पवार माध्यमे व कार्यकर्त्यांना टाळत निघून गेले

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधणे टाळले

  • निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयापासून शंभर मीटरपर्यंतच्या प्रतिबंधित क्षेत्रात येऊन, कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर कार्यकर्ते व समर्थकांची घोषणाबाजी

  • खंडोबा माळपासून निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयापर्यंतची व परिसरातील दुकाने मिरवणूक जाईपर्यंत पूर्णतः बंद.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: Ram Naik: "विक्रमी संख्येने मतदान करा," पंतप्रधान मोदींचे मराठीतून आवाहन

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 20 मे 2024

IPL 2024: अखेर साखळी फेरीची सांगता झाली अन् दुसऱ्या क्रमांकाची रस्सीखेच हैदराबादानं जिंकली

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

SCROLL FOR NEXT